नाशिकच्या पोलिसांचा नंदुरबारजवळ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:06 AM2020-02-22T01:06:06+5:302020-02-22T01:25:31+5:30
राज्यपालांच्या नंदुरबार दौऱ्याचा बंदोबस्त आटोपून गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री मुख्यालयाकडे परतणाºया नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वाहनास अपघात होऊन त्यात दहा कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात तळोदा- नंदुरबार मार्गावरील पथराई गावाजवळ झाला.
नाशिक : राज्यपालांच्या नंदुरबार दौऱ्याचा बंदोबस्त आटोपून गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री मुख्यालयाकडे परतणाºया नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वाहनास अपघात होऊन त्यात दहा कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात तळोदा- नंदुरबार मार्गावरील पथराई गावाजवळ झाला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गुरुवारी नंंदुरबार दौºयावर होते. या दौºयानिमित्त नाशिक विभागातील पोलीस बंदोबस्त रवाना करण्यात आले होते. त्यात नाशिक ग्रामीणच्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी या दत्तक गावी भेट देऊन राज्यपाल कोश्यारी रवाना झाल्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस कर्मचारी आपला बंदोबस्त आटोपून नंदुरबार येथील जिल्हा अधीक्षक कार्यालयात जाण्यासाठी प्रवासास लागले असता हा अपघात झाला. नंदुरबारनजीकच्या पथराई गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. चालकाने प्रसंगावधान राखत आपले वाहन रस्त्याच्या खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र वाहन खड्ड्यात आदळल्याने पोलीस व्हॅनमधील १८ पैकी दहा कर्मचारी जखमी झाले. जखमींना तातडीने नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सर्व कर्मचाºयांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.