खासदार संजय राऊत यांना 'ते' आवाहन पडले महागात; नाशिक पोलिसांनी केला गुन्हा दाखल

By संजय पाठक | Published: May 14, 2023 01:20 PM2023-05-14T13:20:17+5:302023-05-14T13:20:40+5:30

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Police has registered a case against Thackeray group MP Sanjay Raut. | खासदार संजय राऊत यांना 'ते' आवाहन पडले महागात; नाशिक पोलिसांनी केला गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांना 'ते' आवाहन पडले महागात; नाशिक पोलिसांनी केला गुन्हा दाखल

googlenewsNext

नाशिक-  राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करू नये हे आवाहन खासदार संजय राऊत यांना महागात पडले असून नाशिकपोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी शनिवारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत घेतली यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने भाष्य केले त्यावेळी त्यांनी राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे सर्वोच्च न्यायालयाने ते बेकायदेशीरच ठरवले आहेत. त्यामुळे अशा घटनाबाह्य आणि बेकादेशीर सरकारच्या आदेशांचे पालन करू नये असा आवाहन केले होते. त्या अनुषंगाने  पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Nashik Police has registered a case against Thackeray group MP Sanjay Raut.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.