गृहशांतीच्या पूजेत अपशकुन झाल्याचे सांगत १५ तोळे सोने व १४ लाख रुपये उकळणा-या भोंदू तांत्रिकाची पूजा नाशिक पोलिसांनी उलथवली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 04:24 PM2017-11-14T16:24:03+5:302017-11-14T16:27:09+5:30
पोलिसांनी संशयावरून त्या मुलीला ताब्यात घेतले असता तिने चोरीमागील कहाणी स्पष्ट केली. कहाणी ऐकू न पोलीसही चक्रावले सदर बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे लक्षात येताच उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे, पोलीस निरिक्षक सुनील रोहोकले, सहायक पोलीस निरिक्षक सारिका आहिरराव यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने संशयित आरोपी तांत्रिक भोंदूगिरी करणारा बाबा उदयराज पांडेच्या मुसक्या कल्याण येथे जाऊन आवळल्या.
नाशिक : गृहशांतीसाठी अंबरनाथच्या एका भोंदूबाबाने एक लाख १० हजार रुपयांची ‘देणगी’ घेऊन नाशिकमधील शरणपूररोडवरील एका कु टुंबीयांच्या घरात पूजापाठ मांडला. पूजेदरम्यान दिवा विझला आता अपशकून झाला असे सांगून खंडित दिवा घरात ठेवण्यास सांगितले; मात्र संबंधितांनी नकार देत दिव्यासह पुजेचा पाठ फेकून दिल्याचा राग मनात धरून भोंदूबाबाने जादूटोण्याच्या सहाय्याने ‘तुझ्या बापाला मारून टाकेल, तू पूजा पुर्ण कर’ असे धमकावत फिर्यादी नितीन फिरोदिया यांच्या घरात फिरोदिया यांच्या मैत्रिणीच्या मुलीला चोरी करण्यास भाग पाडले. मुलीने फिरोदिया यांच्या घरातून चौदा लाख रुपये रोख व पंधरा तोळे सोने चोरी केले. सदर बाब फिरोदिया यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संशयित मुलीच्या नावाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयावरून त्या मुलीला ताब्यात घेतले असता तिने चोरीमागील कहाणी स्पष्ट केली. कहाणी ऐकू न पोलीसही चक्रावले सदर बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे लक्षात येताच उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे, पोलीस निरिक्षक सुनील रोहोकले, सहायक पोलीस निरिक्षक सारिका आहिरराव यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने संशयित आरोपी तांत्रिक भोंदूगिरी करणारा बाबा उदयराज पांडेच्या मुसक्या कल्याण येथे जाऊन आवळल्या. या पांडेने शहरातील अजून काही कुटुंबियांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा पोलिसांना संशय आहे. ज्या मुलीने चोरी केली त्या मुलीच्या आई-वडिलांनी चोरी केलेली रक्कम व दागिणे हे फिरोदिया यांना पुन्हा परत केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भोंदू बाबावर पोलिसांनी चोरीस प्रवृत्त करणे, औषधे-तिलस्मी उपचाराच्या आक्षेपार्ह जाहिरात करणे, महाराष्टÑ नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदू बाबाकडून पोलीस तपासात पुढील अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.