नाशिकचा टपाल बटवडा ठप्प; ३२४ पैकी ११९ कार्यालयांत कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:11 PM2020-01-08T18:11:28+5:302020-01-08T18:13:16+5:30
सर्व केंद्र अस्थापनेतील रिक्त असलेले एकूण ६ लाख पदे त्वरित भरावी. ग्रामिण डाकसेवकांना खात्यात समाविष्ट करा. ग्रॅच्युटी ५ लाख करावी. निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ निवृत्तीच्या दिवशी दिले जावे, अशा विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी संपात उडी घेतली.
नाशिक : सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध संघटनांनी बुधवारी (दि.८) पुकारलेल्या देशव्यापी संपात टपाल कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. शहरी भागातील पोस्टमनपासून ग्रामिण डाकसेवकांसह मेल वाहने चालविणारे चालक संपात उतरल्याने शहरासह जिल्ह्याचे टपाल ‘जैसे-थे’ पडून राहिले. संपुर्ण दिवसभर आलेल्या टपालाचा बटवडा नाशिक मुख्य टपाल कार्यालयातून अन्य उपकार्यालये, शाखा कार्यालयांपर्यंतदेखील होऊ शकला नाही. तसेच नाशिक टपाल विभागातील एकूण ८३८ कर्मचाऱ्यांपैकी केवळ २११ कर्मचा-यांनी आपआपल्या कार्यालयांत हजेरी लावली. एकूण ३२४ पैकी ११९ कार्यालयांमध्ये कामकाज पार पडले.
नवीन पेन्शन योजना रद्द करावी. सर्व कर्मचा-यांना अखेरच्या पगाराच्या ५० टक्क्यांपर्यंत एवढी रक्कम किमान पेन्शनची हमी द्यावी. २०१६पासून थकलेला घरभाडे भत्ता द्यावा. सातव्या वेतनआयोगाच्या अंमलबजावणीतील सर्व त्रुटी दूर कराव्या. सर्व केंद्र अस्थापनेतील रिक्त असलेले एकूण ६ लाख पदे त्वरित भरावी. ग्रामिण डाकसेवकांना खात्यात समाविष्ट करा. ग्रॅच्युटी ५ लाख करावी. निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ निवृत्तीच्या दिवशी दिले जावे, अशा विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी संपात उडी घेतली.
आॅल इंडिया पोस्ट एम्प्लॉईज युनियन, नॅशनल असोसिएशन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज, ग्रूप सी, पोस्टमन व ग्रूप डी, आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन अशा तीनही संघटनांचे सदस्यांनी संपात सहभाग नोंदविला. यामुळे नाशिक शहरातील मुख्य टपाल कार्यालयापासून या कार्यालयांतर्गत येणारे सर्व उपक ार्यालये, शाखा कार्यालयांसह ग्रामीण भागातील टपालाचा बटवडा ठप्प झाला. सकाळच्या सुमारास टपाल कर्मचाºयांसह पोस्टमन, ग्रामीण डाकसेवकांनी एकत्र येत मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बैठक घेत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चात सहभाग घेतला
६२७ कर्मचारी संपात सहभागी
मुख्य टपाल कार्यालयाच्या अखत्यारितितील १२३ पोस्टमनपैकी केवळ ३५ पोस्टमन, एमटीएसचे ५७ पैकी १४ तर ग्रामीण डाकसेवक ३८६ पैकी केवळ ७८ आणि अन्य कार्यालयीन कर्मचारी ४७ सुपरवायझरसह अन्य पदांवरील २२५ अधिकाºयांपैकी ८४ असे एकूण २११ कर्मचाºयांनी नियमितपणे क र्तव्य बजावले. याव्यतिरिक्त ८३८ कर्मचाºयांनी मात्र संपात सहभागी होणे पसंत केले. परिणामी शहरासह जिल्ह्याती टपालसेवा प्रभावित झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. नाशिक मुख्य टपाल कार्यालयतील बटवडा कक्षात पोस्टमन नजरेस पडले नाही. संघटनांच्या पदाधिकाºयांनी सुमारे ९२५ पैकी ८०० कर्मचारी संपात सहभागी असल्याचा दावा केला; मात्र प्रवर अधिक्षक कार्यालयाकडून केवळ ६२७ कर्मचारी संपावर असल्याचे सांगितले.