नाशिकचा पारा ३३ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:10 AM2018-03-18T01:10:34+5:302018-03-18T01:10:34+5:30
नाशिकचा पारा ३३ अंशांवरउकाडा वाढला : नागरिक बेजार; शीतपेयांना मागणीनाशिक : शहराचे कमाल तपमान काही अंशांनी जरी घसरले असले तरी वातावरणात उष्मा वाढला आहे. शनिवारी कमाल तपमानाचा पारा ३३.६ अंशांपर्यंत पोहचला. वाऱ्याचा वेग प्रचंड मंदावलेला असल्यामुळे नाशिककरांना दिवसभर उकाडा जाणवत होता.
नाशिक : शहराचे कमाल तपमान काही अंशांनी जरी घसरले असले तरी वातावरणात उष्मा वाढला आहे. शनिवारी कमाल तपमानाचा पारा ३३.६ अंशांपर्यंत पोहचला. वाऱ्याचा वेग प्रचंड मंदावलेला असल्यामुळे नाशिककरांना दिवसभर उकाडा जाणवत होता.
शहराचे किमान तपमान ३६.५ अंशांपर्यंत पोहचले होते; मात्र ढगाळ हवामानामुळे गुरुवारपासून पारा काहीअंशी घसरला. गुरुवारी ३०.५ अंश इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर शुक्रवारपासून पुन्हा पारा वर सरकण्यास सुरुवात झाली. एकूणच शहराच्या हवामानात बदल झाला असून, पुन्हा उष्मा वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक बेजार झाले आहेत. उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिकांकडून शीतपेयांचा आधार घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. शहरातील विविध रस्त्यांवर लिंबू सरबत, ताक विक्रेते, उसाचा रस विक्रेत्यांची संख्या वाढू लागली आहे. हंगामी विक्रेत्यांमध्ये वाढ होत आहे. शीतपेयांना मागणी वाढत आहे. उन्हापासून संरक्षणासाठी नागरिक घराबाहेर पडताना टोपी, गॉगल्स, सनकोट वापरास प्राधान्य देत आहे. उन्हाच्या झळा तीव्र होत असताना पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत शहराचे वातावरण अधिक उष्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिकच्या तपमानाचा पारा मागील दोन ते तीन वर्षांपासून उन्हाळ्यात अधिकाधिक वाढू लागला असून, शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने हे घातक आहे. शहराच्या तपमानात होत असलेली वाढ चिंताजनक आहे. मुंबई, पुण्याच्या तुलनेत नाशिकदेखील उन्हाळ्यात आता तापू लागले आहे.