नाशिक प्रादेशिक परिवहन विभाग  महसूल उत्पन्नात राज्यात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:46 AM2018-11-27T00:46:44+5:302018-11-27T00:47:01+5:30

प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) अर्थात आपले सरकार या सेवा केंद्रातील विविध सेवांचा जिल्ह्यातील २८ हजार ८४९ नागरिकांनी लाभ घेता असून, याद्वारे ४ कोटी १८ लाख ४ हजार १५१ रुपयांचा महसूल मिळाला आहे़

 Nashik Regional Transport Department revenue second in the state in revenue | नाशिक प्रादेशिक परिवहन विभाग  महसूल उत्पन्नात राज्यात द्वितीय

नाशिक प्रादेशिक परिवहन विभाग  महसूल उत्पन्नात राज्यात द्वितीय

googlenewsNext

नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) अर्थात आपले सरकार या सेवा केंद्रातील विविध सेवांचा जिल्ह्यातील २८ हजार ८४९ नागरिकांनी लाभ घेता असून, याद्वारे ४ कोटी १८ लाख ४ हजार १५१ रुपयांचा महसूल मिळाला आहे़ ठाणे जिल्ह्यापाठोपाठ हा द्वितीय क्रमांकाचा महसूल असून, एसएससी केंद्रामुळे घराजवळच आरटीओच्या सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे़  आपले सरकार या सेवा केंद्रामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासत नसून त्यांची कामे आनॅलाइनद्वारे सुलभ पद्धतीने होतात़ प्रादेशिक विभागाने काही दिवसांपूर्वीच सुरू केलेल्या या सेवेमध्ये प्रत्येक कामासाठीचे शासकीय शुल्क निश्चित केले असून, याद्वारे संबंधित विभागाला महसूल मिळतो़ प्रादेशिक परिवहन विभागातील कामासाठी जिल्ह्यातील २८ हजार ८४९ नागरिकांनी ५९७ सीएससी केंद्राद्वारे कामे केली आहेत़ ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाची ३४४ सीएससी केंद्र असून, त्याचा ३१ हजार ८६६ नागरिकांनी लाभ घेऊन ६ कोटी ३५ लाख ५० हजार २० रुपयांचा राज्यातील सर्वाधिक महसूल मिळवून दिला आहे़ त्याखालोखाल नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा क्रमांक आहे़ विशेष म्हणजे यामुळे आरटीओतील एजंटगिरीला चाप बसला असून, नागरिकांचे हेलपाटे वाचले आहेत़ दरम्यान, भविष्यात या केंद्राची संख्या आणखीन वाढविली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे़
२४ कोटी २८ लाखांचा महसूल
प्रादेशिक परिवहन विभागाचे राज्यभरात चार हजार ३७६ केंद्र असून, त्याचा १ लाख ९९ हजार ३३३ नागरिकांनी लाभ घेतला आहे़ यामुळे आरटीओस २४ कोटी २८ लाख ४८ हजार ४५७ रुपयांचा महसूल मिळाला आहे़

Web Title:  Nashik Regional Transport Department revenue second in the state in revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.