नाशिकच्या हवालदाराचा मुंबईत प्रशिक्षणादरम्यान मृत्यू
By Admin | Published: April 6, 2017 09:12 PM2017-04-06T21:12:13+5:302017-04-06T21:12:13+5:30
येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत असलेले घनश्याम हांडगे (५०) यांचा मुंबई येथील भायखळा वाहतूक शाखा अकादमीत प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला.
नाशिकच्या हवालदाराचा मुंबईत प्रशिक्षणादरम्यान मृत्यू
नाशिक : येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत असलेले घनश्याम सहादू हांडगे (४९) यांचा मुंबई येथील भायखळा वाहतूक शाखा अकादमीत प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला.
भगूर येथील रहिवासी हांडगे हे वाहतूक शाखेत पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. वाहतुक नियमनाच्या प्रशिक्षणासाठी हांडगे हे मुंबईला गेले होते. नाशिकवरून एकूण १५ पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यास आले होते. त्यामध्ये हांडगे यांचाही समावेश होता. भायखळा येथील वाहतूक शाखेच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू असताना गुरूवारी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जे.जे.रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टारांनी तपासून मयत घोषित केले, अशी माहिती नाशिक शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे. हांडगे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.