चीन विरोधात नाशिककरांच्या संतापाचा भडका ; चीनी वस्तूंची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 07:10 PM2020-06-19T19:10:55+5:302020-06-19T19:15:07+5:30
उद्योग व्यापार जगतातूनही चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्वसामान्य नाशिककरांमध्ये चीनच्या या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमधील मेनरोड परिसरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चीनचा व चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपींग यांच्या प्रतिकात्क पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला.
नाशिक : भारताविरोधी भूमिका घेण्यासोबतच भारत-चीन सीमेवरील गवलान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण भारतभरातून चीनविरोधात संताप उफाळून येत असतानाच नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रे त्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला. तसेच उद्योग व्यापार जगतातूनही चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्वसामान्य नाशिककरांमध्ये चीनच्या या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिकमधील मेनरोड परिसरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चीनचा व चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपींग् यांच्या प्रतिकात्क पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला. यावेळी परिसराल नागरिकांनीही चिन विरोधात घोषणाबाजी केली. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांकडूनही चिनविरोधी संताप व्यक्त होत असून देशात सत्तेत असलेल्या भाजपनेही चिन विरोधात संचाप व्यक्त करीत चीनच्या कृत्याचा निषेध केला आहे. चीनी सैन्याने सीमा रेषा ओलांडून भारतीय सैन्यावर आक्रमक केल्याने त्यात अनेक भारतीय सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. चीनने केलेल्या हल्ल्यामुळे सर्व देशभरात चीन विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या या प्रवृत्तीमुळे चीनचा निषेध नोंदवत प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्यावतीने चीन राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात येऊन पुतळा दहन करण्यात आला. यावेळी चीन बनावट मोबाईल फोन, टी व्ही स्क्रीन चिनी बनावटीचे इलेक्ट्रिकल उपकरणांची तोडफोड करण्यात येऊन चीनी वस्तू जाळण्यात आल्या. सर्व नागरिकांनी यापुढे चीनी बनावटीच्या कोणत्याही वस्तू वापरू नये व खरेदी करू नये असे आवाहन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारत माता की जय असे म्हणत चीन विरोधी घोषणा दिल्या.