बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांमुळे नाशिककर भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:37 PM2020-05-12T21:37:27+5:302020-05-12T23:25:43+5:30
नाशिक : कोरोना संसर्गाची भीती कायम असल्यामुळे सध्या आपल्या परिसरात आणि सोसायटीमध्ये अचानक येणाºया नागरिकांमुळे रहिवासी मात्र चिंताग्रस्त होत असून, संबंधितांनी महापालिकेकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेकडे अशा तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे.

कोरोनामुळे जगात भीतीचे वातावरण आहे. देशात २३ मार्चपासून लॉकडाउन आणि संचारबंदी घोषित करण्यात आली. त्यानंतर आता त्यात शिथिलता देण्यात आली असली तरी अजूनही नागरिकांत भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाºया व्यक्तीविषयी माहिती नसल्यामुळे अशा आगंतूक नागरिकांमुळे परिसरात काळजी व्यक्त केली जात आहे. विशेषत: विदेशातून त्याचबरोबर मुंबई-पुणे आणि मालेगाव येथून आलेल्या नागरिकांमुळे रहिवाशांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात तत्काळ जिल्हा रुग्णालय किंवा महापालिकेकडे तक्रारी करण्यात येत आहेत. संबंधित नागरिकांनी महापालिकेला कळवले आहे किंवा नाही त्याचप्रमाणे त्यांची आरोग्य तपासणी झाली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्याची मागणीदेखील नागरिक करीत आहे. अनेक नागरिक या संदर्भात नगरसेवकांकडे तक्रारी करीत आहे.
शहरांमध्ये आधी कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित असली तरी बाहेरगावाहून आलेल्यांमुळेच स्थानिक नागरिकांना संसर्ग झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.