विजेच्या लपंडावाने नाशिककर हैराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 10:14 PM2020-10-11T22:14:12+5:302020-10-12T01:14:23+5:30

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विजेच्या सातत्याने होणा:या लपंडावाने नाशिककर नागरिक हैराण झाले आहेत.नागरिकांना वर्क फ्रॉम होम आणि विद्यार्थ्याना आॅनलाईन शाळादेखील करण्यास वीज नसणो अडथळा ठरु लागले असल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Nashik residents harassed by power outage! | विजेच्या लपंडावाने नाशिककर हैराण!

विजेच्या लपंडावाने नाशिककर हैराण!

Next
ठळक मुद्देवारंवार येणा:या अडथळ्यांनी कामकाजावर, विद्यार्थ्याच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो.

नाशिक ( प्रतिनिधी )- गेल्या काही दिवसांपासून विजेच्या सातत्याने होणा:या लपंडावाने नाशिककर नागरिक हैराण झाले आहेत.नागरिकांना वर्क फ्रॉम होम आणि विद्यार्थ्याना आॅनलाईन शाळादेखील करण्यास वीज नसणो अडथळा ठरु लागले असल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
लॉकडाऊनपासून गेले सहा महिने नागरिकांचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे आॅनलाईन वर्ग, क्लासेस सुरू आहेत. त्यामुळे सर्वांनाच विजेवर अवलंबून रहावे लागते. अशातच सातत्याने काही मिनिटांपासून तासांपर्यंत वीजप्रवाह खंडित होतो व काम ठप्प होते. वारंवार येणा:या अडथळ्यांनी कामकाजावर, विद्यार्थ्याच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो.घरांमध्ये वयोवृद्ध नागरिक तसेच रूग्णही असतात त्यांना विजेअभावी अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांकडून विजिबलाची रक्कम विद्युत वितरण विभाग तत्परतेने जमा करतो. एखाद्या ग्राहकाने काही कारणाने विजिबलाची रक्कम वेळेत भरली नाही तर तातडीने त्याची विजजोडणी तोडली जाते. ही तत्परता एरवी कुठे जाते ? असा सवाल नागरिक करीत आहेत. अनेकदा तर ग्राहकांकडून वाढीव बिलांबाबत बोंब झाल्यानंतरही त्याची दखलही घेतली जात नाही. वीज बिल वेळेवर भरणा:या नागरिकांना अखंडीतपणो वीज मिळणो हा ग्राहकांचा हक्क आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यावर संबंधित विभागाशी दूरध्वनीवर संपर्क साधल्यास ब:याचदा एंगेजटोन येत राहतो. यदाकदाचित फोन लागलाच तर तो स्वीकारला जात नाही. संभाषण झालेच तर थातुरमातुर उत्तर मिळते.
पावसाळ्यात वीज प्रवाह खंडीत होण्यासाठी थोडयाशा पावसाचेही निमित्त पुरते. वारंवार तांत्रिक बिघाड कसे होतात ? असाही प्रश्न नागरिकांना पडतो. तसेच गत पंधरवड?ापासून पाऊस फारसा नसूनदेखील वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. सध्या भारिनयमन नाही पण केंव्हाही वीज गायब होते. भारिनयमनासाठी ठराविक वेळ तरी ठरलेली असते. त्यानुसार सर्वजण आपल्या कामकाजाचे वेळापत्नक ठरवू शकतात.पण सध्या वीज केव्हा गायब होईल याला धरबंधच राहिलेला नाही. त्यामुळे वीजपुरवठ?ाबाबत महावितरणने गांभियर्पूर्वक काम करण्याची आवश्यकता असून नागरिकांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा द्यावा, अशी ते मागणी करीत आहेत.

 

Web Title: Nashik residents harassed by power outage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.