नाशिककरांनी साडेतीन लाखांचा भरला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 09:16 PM2020-04-30T21:16:42+5:302020-04-30T23:24:22+5:30

नाशिक : लॉकडाउन काळात सर्रासपणे दुचाकी घेऊन रस्त्यांवर वावरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांतर्गत कारवाई करून पोलिसांनी ३ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा दंड नाशिककरांकडून लॉकडाउन काळात वसूल केला आहे.

 Nashik residents pay fine of Rs 3.5 lakh | नाशिककरांनी साडेतीन लाखांचा भरला दंड

नाशिककरांनी साडेतीन लाखांचा भरला दंड

Next

नाशिक : लॉकडाउन काळात सर्रासपणे दुचाकी घेऊन रस्त्यांवर वावरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांतर्गत कारवाई करून पोलिसांनी ३ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा दंड नाशिककरांकडून लॉकडाउन काळात वसूल केला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना एकूण दंड १८ लाख ९० हजार १०० रुपये इतका करण्यात आला असून, त्यापैकी १५ लाख २६ हजार ७०० रुपयांची वसुली शिल्लक आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दररोज संशयित रुग्णही उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा २७६ वर पोहोचला आहे. सर्वाधिक २५३ रुग्ण मालेगावमधील आहेत. तसेच शहरातदेखील ११ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.
कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीकरिता सकाळी १० ते दुपारी ४ अशी वेळ निर्धारित केली गेली आहे. शहर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड लावून कोणीही विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली आहे.
२० एप्रिलपासून लॉकडाउनमध्ये काहीशी सूट काही ठराविक अस्थापनांना विविध नियम, अटींच्या अधीन राहून देण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा सर्वसामान्य लोकांकडून घेतला जात आहे.
पोलीस प्रशासनाकडून संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त वाढविण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून आद्यपही फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १९ मार्चपासून अद्याप १ हजार ५३९ लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच ३ हजार ६७६ लोकांविरुद्ध भादंवि कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्तांनी शहरात अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. मात्र बहुतांश लोक अद्यापही मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करतात. या लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अद्याप तब्बल ५८० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
---------
पावणे चार हजार लोकांवर गुन्हे
लॉकडाउन लवकर संपवावा, असे प्रत्येकालाच वाटते; मात्र अपवाद वगळता प्रामाणिकपणे किती लोक आपापल्या घरातच थांबतात? विनाकारण रस्त्यांवर येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. तरीदेखील अद्याप फारसे गांभीर्य नागरिकांत दिसून येत नाही. महिनाभरात लॉकडाउनला बाधा निर्माण करत जमावबंदी, संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाºया तब्बल ३ हजार ६७६ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले आहेत.

Web Title:  Nashik residents pay fine of Rs 3.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक