साडे तीन लाखांचा नाशिककरांनी लॉकडाऊनमध्ये भरला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 06:22 PM2020-04-28T18:22:58+5:302020-04-28T18:28:19+5:30

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच दररोज संशयित रुग्णही उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 193वर पोहचला आहे. सर्वाधिक रुग्ण मालेगावमधील आहे.तसेच शहरात देखील 11 कोरोनाग्रस्त आढळून आले

Nashik residents pay fine of Rs 3.5 lakh in lockdown | साडे तीन लाखांचा नाशिककरांनी लॉकडाऊनमध्ये भरला दंड

साडे तीन लाखांचा नाशिककरांनी लॉकडाऊनमध्ये भरला दंड

Next
ठळक मुद्देपावणे चार हजार लोकांविरुद्ध गुन्हेलॉकडाऊनचे उल्लंघन, 2हजार दुचाकी जप्त

नाशिक : पोलीस आयुक्तांनी शहरात अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क चा वापर बंधनकारक केला आहे. मात्र बहुतांश लोक अद्यापही मास्क चा वापर करण्याकडे दुर्लक्ष करतात, अशा लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अद्याप तब्बल 426 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच मोटार वाहन कायदयानुसार विविध कलमांतर्गत कारवाई करून पोलिसांनी 3 लाख 49 हजार 600 रुपयांचा दंड नाशिककरांकडून लॉकडाऊन काळात वसूल केला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना एकूण दंड 17 लाख 94 हजार 800 रूपये इतका करण्यात आला आहे, त्यापैकी 14 लाख 45 हजार 200 रुपयांची वसुली शिल्लक आहे.

लॉकडाऊन लवकर संपवावा असे प्रत्येकालाच वाटते; मात्र अपवाद वगळता प्रामाणिकपणे किती लोक आपापल्या घरातच थांबतात? विनाकारण रस्त्यांवर येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे, तरीदेखील अद्याप फारसे गांभीर्य नागरिकांत दिसून येत नाही. महिनभरात लॉक डाऊनला बाधा निर्माण करत जमावबंदी, संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 3 हजार 676 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले आहेत.

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच दररोज संशयित रुग्णही उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 193वर पोहचला आहे. सर्वाधिक रुग्ण मालेगावमधील आहे.तसेच शहरात देखील 11 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीकरिता सकाळी 10 ते दुपारी 4 अशी वेळ निर्धारित केली गेली आहे. शहर पोलिसानी रस्त्यावर बॅरीकेड लावून कोणीही विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे, अत्यावश्यक गरजेशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन सातत्याने पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे, मात्र नागरिक याकडे सपशेल दुर्लक्ष करून बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. सकाळी दहा ते चार दरम्यान भाजीपाला व किराणा दुकान सुरू ठेवण्याची मुदत असल्याने या कळात रस्त्यावर मोठी गर्दी होत आहे. ज्यांना काहीच सामान घ्यायचे नाही, अशा लोकांकडून विनाकारण गर्दी केली जात आहे. एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्य सर्रासपणे भाजीपाला, किराणा खरेदीसाठी बाहेर फिरताना आढळून येत आहेत, त्यामुळेच लॉक डाऊन चा फज्जा उडत आहे. 20 एप्रिल पासून लॉक डाऊन मध्ये काहीशी सूट काही ठराविक अस्थापनांना विविध नियम, अटींच्या अधीन राहून देण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा सर्वसामान्य लोकांकडून घेतला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त वाढविण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून आद्यपही फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 19 मार्च पासून अद्याप 1हजार 539 लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच 3 हजार 676 लोकांविरुद्ध भादंवि कलम 188नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

2 हजार दुचाकी जप्त

नागरिकांनी सर्रासपणे रस्त्यांवर दुचाकीने संचार करू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांकडून रस्ता बंदी करण्यात आली आहे. तरीदेखील नागरिक दुचाकी घेऊन विनाकारण रस्त्यावर येत असल्याने अशा लोकांच्या दुचाकी पुढील 3 महिन्यांसाठी जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अद्याप 1 हजार 950 दुचाकी आयुक्तालयाच्या हद्दीत जप्त केल्या गेल्या आहेत.

 

 


 

Web Title: Nashik residents pay fine of Rs 3.5 lakh in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.