नाशिककरांनो; कर-पाणीपट्टी वेळेत भरा..अन्यथा...

By Suyog.joshi | Updated: January 28, 2025 15:54 IST2025-01-28T15:53:52+5:302025-01-28T15:54:15+5:30

चलत अथवा स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचा इशारा मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिला आहे.

Nashik residents; Pay your taxes and water bills on time..otherwise... | नाशिककरांनो; कर-पाणीपट्टी वेळेत भरा..अन्यथा...

नाशिककरांनो; कर-पाणीपट्टी वेळेत भरा..अन्यथा...

सुयोग जोशी

नाशिक : महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी वेळेत भरा, अन्यथा ज्या मिळकतधारकांनी अद्यापही भरणा केलेला नाही, अशांची चलत अथवा स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचा इशारा मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिला आहे.

मालमत्ता कर थकबाकीदार करदात्यांकरीता, थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास, त्यांना लागू असलेल्या शास्ती व इतर फीमध्ये माहे ऑक्टोंबर ते माहे डिसेंबर २०२४ करीता ९५ टक्के सवलत व माहे जानेवारी २०२५ करीता ८५ टक्के सवलत योजना राबविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ ४१०४६ मिळकतधारकांनी प्राप्त केला आहे. करदात्यांच्या सोईकरीता, मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी दि. ३१ मार्च पर्यंत सर्व शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवशी, सर्व विभागीय कार्यालये व उपकार्यालयातील नागरी सुविधा केंद्र हे करांचा भरणा स्विकारण्यासाठी नियमितपणे कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.

थकबाकीदार करदात्यांकरीता, सवलतीची शेवटची संधी असल्याने, सदर संधीचा लाभ घेण्यात यावा अन्यथा सवलतीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर नाईलाजास्तव अधिनियमातील तरतुदीनुसार जप्तीची  कारवाई करण्यात येईल याची थकबाकीदार करदात्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी केले आहे.

Web Title: Nashik residents; Pay your taxes and water bills on time..otherwise...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक