‘त्या’ स्फोटसदृश गूढ आवाजाने नाशिककर हादरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:13 PM2020-04-22T22:13:12+5:302020-04-23T00:14:39+5:30

नाशिक : वेळ सकाळी अकरा वाजेची. नाशिककर घरांमध्ये कुटुंबीयांसमवेत असतानाच आकाशात स्फोटसदृश मोठा आवाज झाला. या आवाजाची तीव्रता इतकी प्रचंड होती की बहुसंख्य घरांची दारे-खिडक्याच नव्हे तर भिंतीसुद्धा हादरल्या. हा आवाज केवळ एक ठराविक भागातच नव्हे तर संपूर्ण शहराच्या कानाकोपऱ्यात तितक्याच तीव्रतेने नाशिककरांच्या कानी पडल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले.

 Nashik residents were shaken by the mysterious sound like 'that' explosion! | ‘त्या’ स्फोटसदृश गूढ आवाजाने नाशिककर हादरले!

‘त्या’ स्फोटसदृश गूढ आवाजाने नाशिककर हादरले!

Next

नाशिक : वेळ सकाळी अकरा वाजेची. नाशिककर घरांमध्ये कुटुंबीयांसमवेत असतानाच आकाशात स्फोटसदृश मोठा आवाज झाला. या आवाजाची तीव्रता इतकी प्रचंड होती की बहुसंख्य घरांची दारे-खिडक्याच नव्हे तर भिंतीसुद्धा हादरल्या. हा आवाज केवळ एक ठराविक भागातच नव्हे तर संपूर्ण शहराच्या कानाकोपऱ्यात तितक्याच तीव्रतेने नाशिककरांच्या कानी पडल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले.
बुधवारी (दि.२२) सकाळी अचानकपणे झालेल्या जोरदार आवाजाने सगळ्यांनाच हादरवून सोडले. यावेळी काहींनी घरांची गच्ची गाठून आकाशाकडे डोळे लावले तर काहींनी तत्काळ घराबाहेर येऊन आपल्या परिसरात कुठे काही अनुचित घटना तर घडली नाही ना याची खात्री करून घेतली, मात्र कोठेही कोणालाही काहीही अनुचित घडल्याचे दिसून आले नाही. काहींनी तर जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून त्या आवाजाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशाच पद्धतीने मुख्य अग्निशमन नियंत्रण मुख्यालयातही याबाबत चौकशीसाठी फोन खणखणले. सगळ्यांना उत्सुकता व कुतूहल होते ते त्या कानठळ्या बसवणाºया गूढ आवाजाचे, मात्र कोणालाच कुठूनही त्याबाबत उकल होऊ शकली नाही. तसेच सोशल मीडियावरसुद्धा हा गूढ आवाज चांगलाच घुमला. काही महिन्यांपूर्वी असाच आवाज शहरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ऐकू आला होता, मात्र तेव्हा फारसे काही लोकांचे लक्ष आपल्या व्यस्त दिनचर्येत याकडे वेधले गेले नव्हते.
दरम्यान, या आवाजाची वार्ता शहरात वाºयासारखी पसरली आणि याबाबत चौकशी सुरू झाली. जिल्हा आपत्ती कार्यालयाशी संपर्क साधला असता संबंधितांनी हा आवाज कसल्यातरी प्रकारच्या स्फोटाचा किंवा भारतीय तोफखान्याच्या तोफांच्या नियमित सरावाचा नसल्याचे स्पष्ट केले. तसेच एचएएल ओझरस्थिती कंपनीत तयार केल्या जाणाºया हलक्या लढाऊ विमानांच्या चाचणीदरम्यान त्यांचा सुपरसॉनिक आवाज असल्याचेही सांगण्यात आले. हा आवाज विमानाची चाचणी घेताना अत्यंत उंचीवर विमाने नेली जातात तेव्हा ध्वनिलहरी आणि हवेचा संपर्क होऊन दाब निर्माण होतो आणि त्यातूनच असाच तीव्र सुपरसॉनिक आवाज ऐकू येतो, असे सांगण्यात आले. एचएएलनिर्मित हलके ‘तेजस’ हेदेखील सुपरसोनिक लढाऊ विमान मानले जाते.
-------
...काय आहे ‘सुपरसोनिक साउंड’
जाणकारांच्या म्हणण्यानुसार, हा आवाज ध्वनीच्या गतीपेक्षा पाच पटपेक्षाही अधिक असतो. या आवाजाला बºयाचदा हायपरसॉनिक म्हणूनदेखील ओळखले जाते. विमानाच्या चाचणीदरम्यानचा ध्वनी लवचीक माध्यमात प्रेशर वेव्हच्या रूपात प्रवास करतो. पाण्याच्या तापमानावर सुपरसोनिक वेग १,४४० मीटर म्हणजेच ४ हजार ७२४ फूटपेक्षा जास्त मानला जातो, त्यामुळे साहजिकच हा सुपरसोनिक साउंड हा स्फोटसदृश असल्यासारखा भासतो.
----
...या भागात ऐकू आला आवाज
हा आवाज पहिल्यांदा ओझर परिसरात ऐकू आला, तेथे त्याची तीव्रता अधिकच जाणवल्याचे राहिवाशांनी सांगितले. यावेळी हा आवाज काही सेकंदाने मखमलाबाद, दरी, मातोरी, पंचवटी, सिडको, सातपूर, अंबड, इंदिरानगर, पाथर्डी, वडाळागाव, डीजीपीनगर, नाशिकरोड, देवळाली गाव, जुने नाशिक या सर्व भागांमध्ये ऐकावयास आला.

Web Title:  Nashik residents were shaken by the mysterious sound like 'that' explosion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक