दोन बसच्या धडकेत १८ जखमी नाशिकरोड : बिटको चौकातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:14 AM2017-12-29T01:14:02+5:302017-12-29T01:16:22+5:30

नाशिकरोड : बिटको चौक सिग्नलवर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसवर पाठीमागुन सटाणा-नाशिक-पुणे बस जाऊन आदळल्याने १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. त्यामध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला डोक्यास जास्त मार लागला आहे.

Nashik Road: 18 injured in bus accident | दोन बसच्या धडकेत १८ जखमी नाशिकरोड : बिटको चौकातील घटना

दोन बसच्या धडकेत १८ जखमी नाशिकरोड : बिटको चौकातील घटना

Next
ठळक मुद्दे ब्रेक मारून बस थांबवावी लागलीजखमी प्रवाशांवर तातडीने प्राथमिक उपचार

नाशिकरोड : बिटको चौक सिग्नलवर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसवर पाठीमागुन सटाणा-नाशिक-पुणे बस जाऊन आदळल्याने १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. त्यामध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला डोक्यास जास्त मार लागला आहे.
बसचालक नामदेव भागुजी शेळके हे गुरुवारी सकाळी ९ वाजता एसटी महामंडळाची शिवशाही बस (एमएच ०६-३३२) ही प्रवासी घेऊन नाशिकवरून पुण्यास जाण्यास निघाली. नाशिकरोड दत्तमंदिर सिग्नल ओलांडून बिटको चौकाकडे शिवशाही बस जात असताना अचानक पुढे एका रिक्षाचालकाने रस्त्यातच रिक्षा उभी केल्याने शिवशाही बसचालकाने रिक्षा मागे बस उभी केली. त्यामळे पाठीमागून येणारी एसटी महामंडळाची सटाणा-नाशिक-पुणे बस (एमएच १४ बीटी ४५१९) चालकाला अचानक ब्रेक मारून बस थांबवावी लागली. मात्र यामध्ये सटाणा-पुणे बस ही शिवशाही बसवर पाठीमागून जाऊन आदळली. सटाणा-पुणे बस चालकाने अचानक जोरदार ब्रेक मारल्याने बसमधील सीटवर बसलेले प्रवासी पुढील सीटवर आदळल्याने पाच वर्षांची आराध्या अमोल मुंदवालकर हिच्या डोक्याला दुखापत होऊन ती जास्त जखमी झाली. जखमी प्रवाशांवर तातडीने प्राथमिक उपचार केल्यानंतर काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
प्रवासी संध्या दिगंबर भामरे, अश्विनी धोंडीराम खैरनार, रामदास दीनानाथ बोडके, रोशनी अभिजित गायकवाड, चित्रा प्रमोद सुलेनकर, विजया राजेंद्र पाटील, संजय रामलखन होडेकर, मंगल शंकर ठाकरे, नंदा बाळकृष्ण गायकवाड, पूनम संदीप भांगरे, शंकर पंढरीनाथ बकरे, लतिफा शेख युसूफ, हसन शेख उस्मान, शहीदा शेख हुसेन, अब्दुल रहेमान शेख युसूफ, शैला प्रकाश पवार, सुमनबाई आनंदा खरात यांच्या डोक्याला, हनवटीला, गुडघ्याला आदी ठिकाणी दुखापत झाल्याने जखमी १८ प्रवाशांना त्वरित बिटको रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.

Web Title: Nashik Road: 18 injured in bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात