नाशिकरोड-भगूर स्वा.सावरकर सन्मान रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:45 AM2019-12-20T00:45:45+5:302019-12-20T00:46:23+5:30
भारतीय जनता पक्ष, भाजप युवा मोर्चा आणि सावरकरप्रेमी यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिकरोड ते भगूर सन्मान दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
नाशिकरोड : भारतीय जनता पक्ष, भाजप युवा मोर्चा आणि सावरकरप्रेमी यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिकरोड ते भगूर सन्मान दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
बिटको चौकातून सन्मान रॅलीला गुरुवारी (दि.१९) सकाळी प्रारंभ झाला. रॅलीच्या सुरुवातीला बिटको पॉइंट येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे तसेच रथाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, नाशिकरोड मंडल अध्यक्ष बाजीराव भागवत, नगरसेवक प्रा. शरद मोरे, संगीता गायकवाड, तानाजी करंजकर, हेमंत गायकवाड आदींनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले. रॅली स्वा. सावरकर स्मारक भगूर येथे पोहोचली. सदर रॅलीचा भगूरच्या सावरकर स्मारकाजवळ समारोप झाला. स्मारकात सावरकरांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी सुनील आडके, युवा मोर्चा नाशिकरोड अध्यक्ष शांताराम घंटे, नगरसेवक संभाजी मोरु स्कर, अंबादास पगारे, विजया कंकरेज, सुजाता करजगीकर, पुष्पा शर्मा, सुजाता बागुल, कांता वराडे, किरण मईड, योगेश भगत, संजय कोचर आदी उपस्थित होते.
भगूरला ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत
भगूरला रॅलीचे आगमन होताच स्वा. सावरकरांच्या नावाच्या घोषणांनी भगूर शहर व परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांनी रॅलीचे स्वागत केले. देवळाली कॅम्प शहरात छावणी उपाध्यक्ष भगवान कटारिया, सचिन ठाकरे, सुरेश पाटील, कैलास गायकवाड, तानाजी करंजकर, मधुसूदन गायकवाड, एकनाथ शेटे, नीलेश हासे, प्रसाद आडके, शांताराम शेटे आदींनी रॅलीचे स्वागत केले.