नाशिकरोडला महिलेचे मंगळसूत्र खेचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:25 IST2018-08-28T18:24:51+5:302018-08-28T18:25:54+5:30
नाशिक : पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील दोघा संशयितांनी खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि़२७) सायंकाळच्या सुमारास नाशिकरोड दत्तमंदिराजवळील राजधानी चौक परिसरात घडली़

नाशिकरोडला महिलेचे मंगळसूत्र खेचले
नाशिक : पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील दोघा संशयितांनी खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि़२७) सायंकाळच्या सुमारास नाशिकरोड दत्तमंदिराजवळील राजधानी चौक परिसरात घडली़
भगूर परिसरात विजयनगरमधील रहिवासी आकांक्षा संदीप पाटील या सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या दोन बहिणींसह नाशिकरोडजवळील राजधानी चौकाजवळून पायी जात होत्या़ यावेळी समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने आकांक्षा पाटील यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची साडेतीन तोळे वजनाची सोन्याची पोत खेचून नेली.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़