नाशिकरोड विभाग : वर्षभरापासून नळ आणि घरपट्टी बिलाचे वाटपच नाही

By admin | Published: March 20, 2017 01:25 AM2017-03-20T01:25:50+5:302017-03-20T01:26:17+5:30

पुन्हा बडवला कर्मचारी नसल्याचा ‘ढोल’

Nashik Road Department: There is no allocation of tap and house bill from year to year | नाशिकरोड विभाग : वर्षभरापासून नळ आणि घरपट्टी बिलाचे वाटपच नाही

नाशिकरोड विभाग : वर्षभरापासून नळ आणि घरपट्टी बिलाचे वाटपच नाही

Next

नाशिक : थकबाकीदार असलेल्या करदात्यांचे घर आणि दुकानांपुढे ढोल बडवून त्यांना थकबाकीदार असल्याचे जगजाहीर करण्याच्या महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयाने मात्र दोन वर्षभरापासून बिलांचे वाटपच केले नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने बिलांचे वाटप करण्यात आले नसल्याचा ढोल यावर्षीही बडविण्यात आला आहे. सर्वसामान्य ग्राहकांवर यामुळे वर्षभराचा बोजा पडल्याने त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेने थकबाकीदार करदात्यांकडून कर वसूल करण्याची नामी शक्कल लढविली आहे. थकबाकीदारांचे दुकान अथवा घरापुढे जाऊन पालिकेने ढोल बडविण्याचा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम देखील दिसून आला असून कर भरणा करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीतही भर पडली आहे. मात्र नाशिकरोड विभागात याच्या विपरीत चित्र समोर आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik Road Department: There is no allocation of tap and house bill from year to year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.