नाशिकरोड : प्रवाशांची गैरसोय; प्रबंधकांच्या आदेशाबाबत आश्चर्य व्यक्त रेल्वेस्थानकातील प्रवेशद्वार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:46 AM2019-01-10T01:46:18+5:302019-01-10T01:46:38+5:30
नाशिकरोड : रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागून प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, सामान घेऊन दूरवरून फेरफटका मारत रेल्वेस्थानकांत यावे-जावे लागत आहे.
नाशिकरोड : रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागून प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, सामान घेऊन दूरवरून फेरफटका मारत रेल्वेस्थानकांत यावे-जावे लागत आहे. भुसावळ विभागाच्या प्रबंधकांनी प्रवेशद्वार बंद करण्याबाबत दिलेल्या आदेशाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कुंभमेळ्यास प्रवाशांची, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागून प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येण्या-जाण्यासाठी नवीन रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी भुसावळ विभागाचे प्रबंधक आर. के. यादव यांनी रेल्वेस्थानकाची पाहणी करताना सुरक्षितेच्या कारणास्तव रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागील प्लॅटफॉर्म एकवर येणारा-जाणारा रस्ता बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ तो मार्ग बंद करून टाकला. पार्सल कार्यालयाच्या परिसरात किंवा प्लॅटफॉर्मवरील पादचारी पुलावरून येणाऱ्या प्रवाशांना मुख्य रेल्वेच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडावे लागत आहे किंवा येणाºया प्रवाशांनादेखील फेरफटका मारत सामानाचे ओझे सांभाळत यावे लागत आहे.
बंद केलेल्या रस्त्याशेजारील पार्सलचे कार्यालय असून, रेल्वे आल्यानंतर बहुतांश प्रवासी हे पार्सल कार्यालयातूनच ये-जा करतात. पार्सल कार्यालयाची जागा छोटी असून, प्रवासी ऐकत नाही. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणाºया प्रवाशांची पार्सल कार्यालयातून जाताना मोठी गर्दी होत असल्याने तेथे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्सल विभागात काम करणारे कामगारदेखील त्रस्त झाले आहेत.
प्रवाशांना घरी जाताना किंवा रेल्वेस्थानकांत येण्यासाठी जो रस्ता सोईस्कर आहे त्याच मार्गाने प्रवासी ये-जा करणार आहे ही बाब लक्षात घेऊन बंद केलेला रस्ता रेल्वे प्रशासनाने सुरू करावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी, कामगार आदींनी केली आहे.