नाशिकरोड प्रभाग सभापती : पंडित आवारे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:12 AM2018-04-21T01:12:54+5:302018-04-21T01:12:54+5:30

नाशिकरोड प्रभाग सभापतिपदी भाजपाचे नगरसेवक पंडित आवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंडित आवारे यांची निवड होताच भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.

Nashik Road Divisional Chairman: Pandit Awara uncontested | नाशिकरोड प्रभाग सभापती : पंडित आवारे बिनविरोध

नाशिकरोड प्रभाग सभापती : पंडित आवारे बिनविरोध

Next

नाशिकरोड : नाशिकरोड प्रभाग सभापतिपदी भाजपाचे नगरसेवक पंडित आवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंडित आवारे यांची निवड होताच भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.नाशिकरोड प्रभाग सभापती पदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी ४ वाजता प्रभाग समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगरसचिव गोरखनाथ आवाळे, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर उपस्थित होते. प्रभाग सभापतिपदासाठी भाजपाचे संदीप आवारे व शिवसेनेकडून ज्योती श्याम खोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले  होते. निवडणूकप्रक्रिया सुरू झाल्यानंतर माघारीसाठी देण्यात आलेल्या १५ मिनिटांच्या मुदतीमध्ये शिवसेनेच्या ज्योती खोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. माघारीच्या मुदतीनंतर सभापतिपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने भाजपाचे पंडित आवारे यांची नाशिकरोड प्रभाग सभापतिपदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. आवारे यांची निवड झाल्यानंतर पदाधिकाºयांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित सदस्यांनी बाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. महापौर रंजन भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी अहेर-आडके यांनी नूतन सभापती पंडित आवारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. nबैठकीला नगरसेवक संभाजी मोरुस्कर, दिनकर आढाव, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, संतोष साळवे, अंबादास पगारे, शरद मोरे, केशव पोरजे, विशाल संगमनेरे, जयश्री खर्जुल, अनिता सातभाई, मंगला आढाव, संगीता गायकवाड, रंजना बोराडे, डॉ. सीमा ताजणे, सुनीता कोठुळे, मीरा हांडगे, सरोज आहिरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका सत्यभामा गाडेकर या दाखल झाल्या होत्या.

Web Title: Nashik Road Divisional Chairman: Pandit Awara uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.