नाशिकरोडला १६ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:22 AM2021-02-23T04:22:33+5:302021-02-23T04:22:33+5:30

जेलरोड, बिटको, पाण्याची टाकी येथे मास्क न वापरण्याविरुद्ध मनपाकडून सोमवारी दुकानदार, वाहनचालक, पादचारी अशा ४० जणांवर कारवाई करुन ८ ...

Nashik Road fined Rs 16,000 | नाशिकरोडला १६ हजारांचा दंड वसूल

नाशिकरोडला १६ हजारांचा दंड वसूल

googlenewsNext

जेलरोड, बिटको, पाण्याची टाकी येथे मास्क न वापरण्याविरुद्ध मनपाकडून सोमवारी दुकानदार, वाहनचालक, पादचारी अशा ४० जणांवर कारवाई करुन ८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. सध्या दोनशे रुपये दंड करण्यात येत असून भविष्यात तो वाढविण्याची शक्यता आहे. नागरिकांनी मास्क वापरुन कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

रविवारी नाशिकरोड घनकचरा व्यवस्थापन विभागाने नाशिकरोड बस स्टँड, रेल्वे स्टेशन व बाजारपेठ परिसरात ४३ नागरिकांवर मास्क न वापरल्याने दंडात्मक कारवाई करुन प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे ८६०० रुपये दंड आकारला होता. सार्वजनिक ठिकाणी डेब्रिज टाकल्याप्रकरणी ५००० व रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्याप्रकरणी १३ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

सदर दंडात्मक कारवाई महापालिकेचे विभागीय अधिकारी दिलीप मेनकर, स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, राजू निरभवणे, विजय जाधव, ज्ञानेश्वर भोसले, विजय मोरे, प्रभाकर थोरात, प्रवीण बिराडे, मुकादम जनार्दन घंटे, सचिन कटारे, विकास शेळके, बाळू आढाव, अमन चंडालिया, बबलू ढकोलिया, चंद्रशेखर पगारे,करण निकम आदींनी केली.

Web Title: Nashik Road fined Rs 16,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.