पुण्यातील दोन अल्पवयीन मुलींवर नाशिकरोडला अतिप्रसंग
By admin | Published: October 28, 2015 11:24 PM2015-10-28T23:24:19+5:302015-10-28T23:26:06+5:30
पुण्यातील दोन अल्पवयीन मुलींवर नाशिकरोडला अतिप्रसंग
नाशिक : पुण्याहून कामाच्या शोधासाठी रेल्वेने नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आलेल्या एका युवतीसह अल्पवयीन मुलीला फूस लावून त्यांच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या दोघा युवकांविरुद्ध नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पुणे देहूरोड येथील युवती व पुणे खडकी भागातील १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी या दोघी पुण्याहून कल्याणमार्गे रेल्वेने गेल्या रविवारी सायंकाळनंतर नाशिकरोड रेल्वे स्थानकावर कामाच्या शोधासाठी नाशिक येथे राहणारा मानलेला भाऊ यास भेटण्यासाठी आल्या होत्या; मात्र त्या मुलींचा रविवारी रात्री मानलेल्या भावाशी मोबाइलवरून संपर्क न झाल्याने त्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार जवळील रेल्वे हॉस्पिटल समोरच रात्री झोपल्या. त्यांचा पाठलाग करणाऱ्या दोघा
युवकांनी सोमवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्या दोघी उठल्यानंतर त्या एकट्या असल्याची संधी साधून त्यांना फूस लावून मोटारसायकलवर बसवून बस स्थानकाजवळील नॅशनल लॉज येथे नेऊन त्यांच्यावर अतिप्रसंग
केला.
दुपारी ३ वाजेनंतर रात्री ९ वाजेपर्यंत सिन्नरफाटा सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पुन्हा एका मुलीवर अतिप्रसंग करून सोडून दिले. सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांना या मुली आढळल्या. त्यांची कैफीयत ऐकल्यानंतर पोलीसांनी तपासचक्रे फिरवून संशयित मयुर ऊर्फ चिंट्या विवेकानंद वाघमारे रा. रोझा कॉलनी मोटवानी रोड, पवन विजय भोळे रा. त्रिशरणनगर स्टेशनवाडी, सिन्नरफाटा यांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात दोघा मुलींवर अतिप्रसंग केल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)