वाहनाच्या धडकेने नाशिकरोडची वृद्धा ठार

By admin | Published: February 22, 2016 11:06 PM2016-02-22T23:06:32+5:302016-02-22T23:29:27+5:30

वाहनाच्या धडकेने नाशिकरोडची वृद्धा ठार

Nashik Road kills the old man | वाहनाच्या धडकेने नाशिकरोडची वृद्धा ठार

वाहनाच्या धडकेने नाशिकरोडची वृद्धा ठार

Next


सिन्नर : मोहदरी घाटात दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात नाशिकरोड येथील वृद्धा ठार झाली. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. नाशिकरोडच्या जेलरोड येथील रहिवासी राजेंद्र सुरेश खैरनार व त्यांची आई भीमाबाई सुरेश खैरनार (६०) ही पल्सर दुचाकीने (क्र. एमएच १५ बीवाय ४२१९) सिन्नरच्या दिशेने येत होते. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर दुचाकी घसरून पडली. यात भीमाबाई यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर राजेंद्र खैरनार जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा
विंचूर : येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पुणे येथे पळवून नेल्याप्रकरणी विंचूरजवळील हनुमान नगर येथील युवकावर लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विंचूर येथील अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लासलगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. यात त्यांच्या मुलीला हनुमाननगर, ता. निफाड येथील मयूर प्रवीण ठुबे याने फूस लावून पळवून नेल्याचे नमूद केले होते. यावरून लासलगाव पोलिसांनी तपास करीत सदर युवकाला मुलीसह पुणे येथून ताब्यात घेतले आहे. लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक आर.बी.सानप यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Nashik Road kills the old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.