गीतमैफलीने नाशिकरोड  व्याख्यानमालेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:08 AM2019-05-11T00:08:11+5:302019-05-11T00:08:30+5:30

ये शाम मस्तानी, मदहोश किये जा..., ये जो मोहब्बत है, ये उनका है काम...,अशा एकापेक्षा एक मधुर हिंदी गीतांद्वारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांच्या स्मृती जागविण्यात आल्या. प्रेक्षकांचाही अलोट प्रतिसाद मिळाला.

 Nashik Road lecture concludes with Gitanflei | गीतमैफलीने नाशिकरोड  व्याख्यानमालेचा समारोप

गीतमैफलीने नाशिकरोड  व्याख्यानमालेचा समारोप

Next

नाशिकरोड : ये शाम मस्तानी, मदहोश किये जा..., ये जो मोहब्बत है, ये उनका है काम...,अशा एकापेक्षा एक मधुर हिंदी गीतांद्वारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांच्या स्मृती जागविण्यात आल्या. प्रेक्षकांचाही अलोट प्रतिसाद मिळाला. नाशिकरोड वसंत व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवारी राजेश खन्नांच्या चित्रपटातील गीतांनी झाला.
अवीट गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले होते. गायक नितीन कुमार, अल्का अंबोरे, राज ढगे यांनी ही गीते सादर केली. उस्मान पटणी यांनी निवेदन केले. गेल्या ३५ वर्षांपासून नाशिकरोड-देवळाली सहकारी बॅँकेतर्फेवसंत व्याख्यानमाला सुरू आहे. महापालिका शाळा क्र मांक १२५ च्या मैदानावर झालेल्या या व्याख्यानमालेला यंदा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेचे सहकार्य लाभले. राहुल साउण्ड ट्रॅक्सने राजेश खन्ना हिट्स गाण्यांचा कार्यक्र म सादर केला. यावेळी ये रेश्मी जुल्फे, ये शरबती आॅँखे..., हमे और जिनेकी चाहत ना होती अगर तुम ना होते... अशा तुने वो रंगिले कैसा जादू किया.... हम तुमसे प्यार कितना..., आदी गीते गायकांनी सादर केली.
गुलाबी आॅँखे जो तेरी देखी...., मे तेरे प्यार पागल मे... आदी गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. ही गाणी स्क्रीनवर पाहण्याची सोय होती. बॅँकेच्या वतीने गायक कलाकारांचा सत्कार करण्यात आला. नाशिकरोड बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, अशोक चोरडिया, श्रीराम गायकवाड, मनोहर कोरडे, अरुण जाधव, रमेश धोंगडे, वसंत अरिंगळे, सुधाकर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. नंदन बूब अध्यक्षस्थानी होते. या व्याख्यानमालेला दहाही दिवस उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांमधून लकी ड्रॉ काढून बक्षिसे देण्यात आली. त्यामुळे श्रोत्यांची उपस्थिती वाढतच आहे. दहा दिवसांच्या या व्याख्यानमालेत छत्रपती संभाजी राजे, श्रीकृष्ण नीती, एव्हरेस्ट मोहीम, नांदा सौख्य भरे आदी विषयांवर नामवंतांची व्याख्याने झाली.

Web Title:  Nashik Road lecture concludes with Gitanflei

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.