नाशिकरोड मुद्रणालय १५ मेपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 01:06 AM2021-05-01T01:06:59+5:302021-05-01T01:08:01+5:30
महाराष्ट्र सरकारने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या व्याप्तीला थांबवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ १ ते १५ मेपर्यंत सरकारने लॉकडाऊन वाढविल्याने मुद्रणालय महामंडळाने भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय देखील १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिकरोड: महाराष्ट्र सरकारने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या व्याप्तीला थांबवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ १ ते १५ मेपर्यंत सरकारने लॉकडाऊन वाढविल्याने मुद्रणालय महामंडळाने भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय देखील १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दोन्ही मुद्रणालय बंद ठेवण्याची मागणी आयएसपी प्रेस मजदूर संघ आणि आयएसपी-सीएनपी स्टाफ युनियनेने केली होती. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुद्रणालय महामंडळ प्रशासनाने आयएसपी व सीएनपी प्रेस बंद १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.