नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे होणार सुशोभिकरण

By admin | Published: October 5, 2016 01:54 AM2016-10-05T01:54:06+5:302016-10-05T01:55:46+5:30

नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे होणार सुशोभिकरण

Nashik Road railway station will be beautified | नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे होणार सुशोभिकरण

नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे होणार सुशोभिकरण

Next

नाशिकरोड : नाशिक शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली असून, नाशिकरोड रेल्वेस्थानक फाईव्ह स्टार टर्मिनस करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. नाशिक-पुणे रेल्वेलाइनसाठी वीस हजार कोटींची मंजुरी मिळाली आहे. त्याचबरोबर नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण करण्यात येईल, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल परिषद व विविध संस्थांतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी, व्ही. जे. आर्य, अशोका युनिव्हर्सल स्कूलचे अशोक कटारिया, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, देवळाली कॅन्टोन्मेन्टचे उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, बळवंत गोडसे, रोटरी क्लबचे गुरुमितसिंग रावल, दीपा चंदराणी, दिग्विजय कापडिया, स्मिता आर्य, प्रिया तुळजापूरकर, देवीदास पंडित, अशोक हुंडेकरी, मिलिंद कुंभेजकर, संतोष पवार, स्थानक प्रबंधक एम. बी. सक्सेना आदि उपस्थित होते. यावेळी रेल परिषद, रोटरी क्लब, देवळाली हायस्कूल, समजा समाज विकास मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर, आनंदऋषी हायस्कूल, एन. आय. टी. पॉलिटेक्निकल, पतंजली संस्थांनी सहभाग घेतला होता.
स्वच्छता अभियानात विद्यार्थ्यांनी रेल्वेस्थानक व परिसर स्वच्छ केला. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतासंदर्भात नाटिका सादर केल्या. तसेच स्वच्छताबाबत संदेश देणारे फलक व स्टिकर्स लावण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik Road railway station will be beautified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.