नाशिकरोडची मतदान यंत्रे ‘सीलबंद

By admin | Published: February 16, 2017 01:19 AM2017-02-16T01:19:39+5:302017-02-16T01:19:55+5:30

’नियोजन : प्रभाग १७ व २१ मध्ये राहणार चार इव्हीएम मशीन्स

Nashik Road voting machines 'sealed' | नाशिकरोडची मतदान यंत्रे ‘सीलबंद

नाशिकरोडची मतदान यंत्रे ‘सीलबंद

Next

नाशिकरोड : मनपानिवडणुकीत नाशिकरोडच्या सहा प्रभागात मतदानासाठी ठेवण्यात येणाऱ्या इलेक्ट्रीक मतदान यंत्रे बुधवारी तपासणी करून ती सीलबंद करण्यात आली. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने प्रभाग १७ व २१ मध्ये चार स्वतंत्र इव्हीएम मशीन व उमेदवारांची संख्या कमी असल्याने प्रभाग २० मध्ये फक्त दोनच इव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.
अवघ्या पाच दिवसांवर मतदान येऊन ठेपले असून निवडणूक विभागांकडून नाशिकरोडच्या सहाही प्रभागात मतदानप्रक्रिया राबविण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या इव्हीएम मशीनची बुधवारी तपासणी करण्यात येऊन सीलबंद करण्यात आल्या. प्रभाग १७, १८ व १९ च्या इव्हीएम मशीन सामनगाव शासकीय तंत्रनिकेतनच्या जिम्नॅशियम हॉलमध्ये, प्रभाग २०, २१ व २२ च्या इव्हीएम मशीन मनपा विभागीय कार्यालयात मशीनची तांत्रिक तपासणी करून व त्यावर उमेदवारांची नावे, निशाणी असलेले बॅलेट पेपर लावून सीलबंद करण्यात आल्या. मतदान केंद्र व तेथील खोलीनुसार इव्हीएम मशीनचे वर्गीकरण करण्यात आले आहे. निवडणूक विभागाची मतदानप्रक्रिया राबविणाऱ्या इव्हीएम मशीनची तपासणी व सीलबंद करण्याचे काम सायंकाळी पूर्ण झाले होते. यावेळी काही उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Nashik Road voting machines 'sealed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.