नाशिकमध्ये पावसामुळे अनेक भागात रस्ते बंद, आठ ठिकाणी झाडे पडली
By संजय पाठक | Published: September 8, 2023 02:57 PM2023-09-08T14:57:50+5:302023-09-08T14:58:57+5:30
रामकुंडावर अडकलेली बस बाहेर काढली.
संजय पाठक, नाशिक- शहरासह परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे सिडको, इंदिरानगर गंगापूररोड पंचवटी अशा 12 ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद झाली होती. महापालिकेच्या वतीने दहा ते बारा ठिकाणी जेसीबी पाठवून पाण्याचा निचरा करण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय शहरात आठ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे देखील वाहतूक ठप्प झाली होती.
महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या वतीने वृक्ष हटविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.आज सकाळपासून पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणातून दुपारी एक वाजता 520 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात सुरू करण्यात आला होता तर दुपारी दोन वाजता तो 1 हजार 401 इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे गोदाकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदीला पाणी वाढल्याने एक बस ही पाण्यामध्ये अडकली होती ती काढण्यात आली आहे.