नाशिक आरटीओचे जागृती अभियान : ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चा नवा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 02:18 PM2018-03-05T14:18:43+5:302018-03-05T14:18:43+5:30

यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली.

Nashik RTO awareness campaign: New message of 'Horn not OK please' | नाशिक आरटीओचे जागृती अभियान : ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चा नवा संदेश

नाशिक आरटीओचे जागृती अभियान : ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चा नवा संदेश

googlenewsNext
ठळक मुद्दे हॉर्नचा वाढता गोंगाट कर्णबधीरपणाला निमंत्रण देणारा ‘कृपया हॉर्न नकोच’ या जनजागृती अभियानाचा शुभारंभ हॉर्न किती वेळा वाजविला व ताशी ४० कि.मीची वेगमर्यादा किती वेळा ओलांडली यावर गुणांकन

नाशिक : ‘कृपया हॉर्न नकोच’ अभियानाचा शुभारंभ नाशिक प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या वतीने सोमवारी (दि.५) करण्यात आला. यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली.
वाढते शहरीकरण व दिवसेंदिवस रस्त्यावर वाढणारी वाहने यामुळे हॉर्नचा वाढता गोंगाट कर्णबधीरपणाला निमंत्रण देणारा ठरत आहे. वाढते ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी आता नाशिक पोलीस आयुक्तालयानंतर प्रादेशिक परिवहन विभागानेही जनजागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानाला सोमवारी परिवहन कार्यालयाच्या आवारातून प्रारंभ करण्यात आला. यावेळी परिवहन विभागाने उपस्थित टॅक्सीचालक, रिक्षाचालकांना ‘कृपया हॉर्न नकोच’ या जनजागृती अभियानाचा प्रचार-प्रसार करणा-या कॅप दिल्या. तसेच वाहनांच्या दर्शनी भागावर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ असे शाब्दिक आवाहन असलेले स्टिकर लावण्यात आले. अभियानाच्या शुभारंभप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्यासह आदि अधिकारी व टॅक्सी संघटना, वाहतूक संघटना, स्कूल बस चालक संघटना, रिक्षाचालक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


शहरातील रस्त्यांवर कमाल वेगमर्यादा ताशी चाळीस किलोमीटर एवढी असावी, तसेच रस्त्यांवरून वाहतुक करताना हॉर्नचा अनावश्यकरिता केला जाणारा वापर टाळावा या दोन निकषांवर आधारित परिवहन विभागाने स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत सहभागी होणा-या वाहनचालकांकडून विहित नमुना अर्ज भरुन घेण्यात आला.


अशी पार पडली स्पर्धा
या स्पर्धेत सुमारे तीस वाहनचालक सहभागी झाले होते दुचाकी-चारचाकी वाहनचालकांसाठी असलेल्या या स्पर्धेचा मार्ग पेठ फाटा (भक्तीधाम) डावीकडे वळण घेत निमाणी स्थानक, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, शालीमार, शरणपूररोड, गंगापूररोड, अशोकस्तंभ, रामवाडी पूलावरून मखमलाबाद नाकामार्गे पेठ फाट्यावरील परिवहन विभागाच्या कार्यालयात समारोप करण्यात आला. या मार्गावर सहभागी स्पर्धक वाहनचालकांवर पर्यवेक्षकांनी नियंत्रण ठेवत अर्जावर विहित नमुन्यात नोंदी नोंदविल्या. यामध्ये प्रामुख्याने हॉर्न किती वेळा वाजविला व ताशी ४० कि.मीची वेगमर्यादा किती वेळा ओलांडली यावर गुणांकन करण्यात आले. यासोबत वाहतुक नियमांचे अन्य नियमांचे कसे उल्लंघन केले व कोणत्या स्वरुपात तेदेखील संबंधिताच्या प्रवेश अर्जावर नमुद करण्यात आले. यासाठी ९० पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले होते.

Web Title: Nashik RTO awareness campaign: New message of 'Horn not OK please'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.