नाशकात कोरोनाचे नियम डावलून कला केंद्रात छमछम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:23+5:302021-04-04T04:15:23+5:30
पायल कला केंद्रात रात्रीच्या वेळी बंद खोलीत लाउड स्पीकरच्या आवाजावर अश्लील नृत्य केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...
पायल कला केंद्रात रात्रीच्या वेळी बंद खोलीत लाउड स्पीकरच्या आवाजावर अश्लील नृत्य केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अंधाराचा फायदा घेत अनेकजण पसार झाले. यावेळी विशाल धोंडिराम मुसळे (वय ४४, रा. पडासाळी, ता. माढा, जि. सोलापूर) हा कला केंद्राचा मालक पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडे परवाना नसल्याचे समजले.
जिल्ह्यात कोरोनाची साथ सुरू असताना व जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत जमावबंदी आदेश दिले असताना हे कला केंद्र सुरू होते. याशिवाय तेथे असलेल्यांच्या चेहऱ्यावर मास्क बांधलेले नव्हते. पोलिसांनी मुसळे याच्यासह भानुदास विश्वनाथ घुगे, समीर असीफ शेख, मंगेश सुदाम भाबड, स्वप्निल कालीदास पाटील या पाच संशयितांना अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.