नाशिकमध्ये शिवसैनिकांचे बंडाचे निशाण, पश्चिममधील नाराजांची बैठक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 04:38 PM2019-10-02T16:38:26+5:302019-10-02T16:40:49+5:30
नाशिक- शहरातील नाशिक पश्चिम मतदार संघ भाजपाकडेच राहील्याने या मतदार संघातील शिवसेनेचे इच्छूक आणि नगरसेवक संतप्त झाले असून त्यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.२) महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बैठक सुरू असून नाराज शिवसैनिकांनी राजीनामा देण्याच तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे
नाशिक- शहरातील नाशिक पश्चिम मतदार संघ भाजपाकडेच राहील्याने या मतदार संघातील शिवसेनेचे इच्छूक आणि नगरसेवक संतप्त झाले असून त्यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.२) महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बैठक सुरू असून नाराज शिवसैनिकांनी राजीनामा देण्याच तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे.
२०१४ मध्ये शहरातील चार पैकी तीन मतदार संघात भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यातील नाशिक पश्चिम मध्ये भाजपच्या सीमा हिरे निवडून आल्या होत्या. आता जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेला हवा आहे. सिडको आणि सातपूरचा समावेश असलेल्या या मतदार संघात शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले आहे. त्यातच सलग दोन लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना याच मतदार संघात सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. परंतु त्यानंतर देखील हा मतदार संघ भाजपाकडेच राहील्याने शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. यासंदर्भात भाजपाला धडा शिकवण्यासाठी बंडखोरांमधून एका इच्छुकाला पुढे करून निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू असून त्यासंदर्भात बैठक देखील सुरू आहे.