भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 10:41 PM2018-05-04T22:41:13+5:302018-05-04T22:41:13+5:30

नाशिक : घोटी-सिन्नर मार्गावरील कोठुळे पेट्रोलपंपाजवळ भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ ४) सकाळच्या सुमारास घडली़ मंगेश हरिभाऊ शेजवळ (५५) आणि शालिनी मंगेश शेजवळ (५०, दोघे, रा. शिवाजीनगर, मिलिंदनगर शेजारी, इगतपुरी) असे अपघातात ठार झालेल्या दांपत्याचे नाव आहे. या प्रकरणी वाडीव-हे पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

nashik, sinnar, ghoti, highway, accident, two, death | भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य ठार

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य ठार

Next
ठळक मुद्देघोटी-सिन्नर मार्गावरील कोठुळे पेट्रोलपंपाजवळअपघात वाडीव-हे पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : घोटी-सिन्नर मार्गावरील कोठुळे पेट्रोलपंपाजवळ भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ ४) सकाळच्या सुमारास घडली़ मंगेश हरिभाऊ शेजवळ (५५) आणि शालिनी मंगेश शेजवळ (५०, दोघे, रा. शिवाजीनगर, मिलिंदनगर शेजारी, इगतपुरी) असे अपघातात ठार झालेल्या दांपत्याचे नाव आहे. या प्रकरणी वाडीव-हे पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मंगेश शेजवळ व त्यांची पत्नी शालिनी हे दुचाकीने घोटी येथून सिन्नर रोडने जात होते़ कोठुळे पेट्रोलपंपाच्या पुढील एमएसईबी कार्यालयासमोर भरधाव ट्रकने (सीजी ०७, एएक्स १९४२) त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात शेजवळ दांपत्य गंभीर जखमी झाले. शालिनी शेजवळ यांच्या हातावरून ट्रक गेल्याने हाताचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले़ तेथील अनिल थोरात यांनी या दांपत्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून मयत घोषित केले़ दांपत्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे़

Web Title: nashik, sinnar, ghoti, highway, accident, two, death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.