कृषीपंप वीजबील दुरूस्तीसाठी विशेष मेळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 05:43 PM2018-02-04T17:43:05+5:302018-02-04T17:47:50+5:30
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी कृषिपंप ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नाशिक ग्रामीण विभागात दिनांक ६ आणि ९ रोजी फिडरिनहाय ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महावितरण : फिडरनिहाया दुरूस्ती; तक्रारींचे होणार निराकरण
नाशिक: मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी कृषिपंप ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नाशिक ग्रामीण विभागात दिनांक ६ आणि ९ रोजी फिडरिनहाय ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होऊन वीजिबलांच्या तक्रारींचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.
कृषी संजीवनी योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांच्या वीज बिलाबाबतच्या तक्रारी सोडविण्यासाठी नाशिक ग्रामीण विभागातील सिन्नर एक, इगतपुरी, दिंडोरी या उपविभागीय कार्यालयात आणि सिन्नर दोन उपविभागातील देवपूर, नांदूर शिंगोटे, वावी, वडांगळी, दापुर व पाथरा येथे दिनांक ६ फेब्रुवारी रोजी ग्राहक मेळावा घेण्यात येणार आहे. तर पेठ उपविभागीय कार्यालय तसेच ओझर व चांदोरी येथील कार्यालयात दिनांक ९ फेब्रुवारी रोजी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वीज बिलाबाबत तक्रारी असणाऱ्या कृषिपंप ग्राहकांनी संबंधित कार्यालयात आपापल्या विवादित बिलासह मेळाव्यांना उपस्थित राहून तक्रारींचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता कुमठेकर यांनी केले आहे.