नाशिक-मुंबई हायवेवर भीषण दुर्घटना; सुसाट ट्रक कारवर आदळल्याने मामा-भाच्यासह दोघे ठार

By अझहर शेख | Published: July 13, 2024 06:08 AM2024-07-13T06:08:18+5:302024-07-13T06:08:33+5:30

हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील चौघे प्रवाशी जागीच ठार झाले.

Nashik speeding truck going from Dwarka to Adgaon hit an oncoming car | नाशिक-मुंबई हायवेवर भीषण दुर्घटना; सुसाट ट्रक कारवर आदळल्याने मामा-भाच्यासह दोघे ठार

नाशिक-मुंबई हायवेवर भीषण दुर्घटना; सुसाट ट्रक कारवर आदळल्याने मामा-भाच्यासह दोघे ठार

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून आडगावकडे कोंबड खत वाहतूक करणारी आयशर ट्रक शुक्रवारी (दि.१३) रात्री अकरावाजेच्या सुमारास मद्यपी चालक सुसाट चालवत होता. याचवेळी ट्रक चा एक टायर फुटला अन चालकाचा ताबा सुटला. ट्रक (एम.एच.15 जीव्ही  9190) दुभाजकावर चढून थेट विरुद्ध बाजूच्या नाशिक लेनवर जाऊन धावत्या ब्रिजा कारवर (एम.एच 05 डीएच 9367) आदळला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील चौघे प्रवाशी जागीच ठार झाले. ट्रक चालक व क्लीनर जखमी झाले आहेत.

आडगावकडून नाशिककडे येणारी ब्रिजा कार संपूर्ण चक्काचूर झाली आहे. या कारमध्ये प्रवासी होते हे सगळे मृत्युमुखी पडले. कारचा चेंदामेंदा झाल्याने. नाशिक अग्निशमन दलाचची मदत मागविण्यात आली. कोणार्कनगर विभागाचे बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून बकारचा पत्रा कापून मृतदेह काढण्यात आले.  या अपघातात रहेमान सुलेमान तांबोळी (४८) त्यांचा भाचा अरबाज चांदुभाई  तांबोळी (२१, दोघे. रा.लेखनगर सिडको), सीज्जू पठाण (३८,रा.इंदिरानगर), अक्षय जाधव (२४,रा. श्रध्दा विहार, इंदिरानगर) या चौघांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहीती आडगाव पोलिसांनी दिली. 

भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याने हे सगळे जण देवळा तालुक्यातील सटाणा येथे गेले होते. तेथून व्यवसाय आटोपून घराकडे नाशिकच्या दिशेने परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली. चौघांवर काळाने झडप घेतली. अरबाजचा महिनाभरपूर्वीच साखरपुडा झाला होता.  रहेमान तांबोळी यांनी पंधरवड्यापूर्वी ठाणे येथून जुनी कार खरेदी केली होती, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.रहेमान यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, ५बहीणी असा परिवार आहे. ते घरातील कर्ता पुरुष होते. 

अरबाज यांच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ, भावजय असा परिवार आहे. या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शासकीय जिल्हा रुग्णालयात नातेवाईक, मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ट्रकचालक, क्लीनर यांच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Web Title: Nashik speeding truck going from Dwarka to Adgaon hit an oncoming car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.