नाशिक : पिंपळगावाजवळ एसटी बस-जीपचा भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 11:56 AM2018-06-23T11:56:09+5:302018-06-23T18:57:49+5:30
पिंपळगावजवळ एसटी बस आणि जीपचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
ओझर (नाशिक) - पिंपळगावाजवळ एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा हायवेवर शिरवाडे फाट्याजवळील ही दुर्घटना आहे.
चांदवड तालुक्यातील खडकजांब गावाच्या शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिककडे जात असताना जीपचे टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात जीप दुभाजक ओलंडून नाशिककडून वडाळीभोईकडे येणार्या सटाणा आगाराच्या बस (एम एच १४, बीटी ४७१६) ला जोरदार धडक दिली.
या धडकेत जीपमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 6 महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. जीपमधील सर्वजण सटाणा तालुक्यातील किकवारी खुर्द येथे एका लग्नासाठी चालले होते. यावेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला. जखमींवर पिंपळगाव बसवत येथे उपचार सुरू आहे.
मृतांची नावे
1) धनुबाई केदा काकुळते (वय 65वर्ष, किकवारी- सटाणा)
2)रतना राजेंद्र गांगुर्डे (वय 45 वर्ष डांगसौदाने)
3)तेजस्री साहेबराव शिंदे
4)क्रुस्णाबाई बापू शिंदे
5)सरस्वतीबाई नथू जगताप
6)अशोक पोपट गांगुर्डे
7) शोभा संतोष पगार (४०)
8) सिद्धी विनायक मोरे (14)