नाशिकमध्ये विद्यार्थ्याने आयसीयुतून दिला दहावीचा अखेरचा पेपर
By संजय पाठक | Published: March 22, 2019 03:42 PM2019-03-22T15:42:25+5:302019-03-22T15:44:47+5:30
नाशिक- दहावीची परीक्षा देत असतानाच तो नेमका जिन्यावरून पडला आणि जखमी झाला. नाशिकच्या एका खासगी हॉस्पीटलमध्ये त्याला आयसीयु मध्ये दाखल करण्यात आली. परंतु त्याची जिद्द आणि बोर्डाची साथ यामुळे त्यानी भूगोलाचा अखेरचा पेपर नाशिकच्या एका रूग्णालयातून दिले.
नाशिक- दहावीची परीक्षा देत असतानाच तो नेमका जिन्यावरून पडला आणि जखमी झाला. नाशिकच्या एका खासगी हॉस्पीटलमध्ये त्याला आयसीयु मध्ये दाखल करण्यात आली. परंतु त्याची जिद्द आणि बोर्डाची साथ यामुळे त्यानी भूगोलाचा अखेरचा पेपर नाशिकच्या एका रूग्णालयातून दिले.
नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील एचएएल हायस्कूलचा विद्यार्थी प्रणव माळी हा नियमीतपणे दहावीचे पेपर देत असताना गुरूवारी (दि.२१) अचानक जिन्यावरून पडला. त्याचे नाक फॅक्चर झाले तसेच हाता पायाला लागल्याने त्याला नाशिकमधील पंचवटी भागातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि ४८ तास त्याला अतिदक्षता विभागातच ठेवावे लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे पालकांची धावपळ उडाली. शाळेत मुख्याध्यापकांशी चर्चा केली. मुलाचा अभ्यास झाला आहे. परंतु एक पेपर देता आला नाही तर हे सत्र वाया जाईल त्यामुळे त्यांनी महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या नाशिक बोर्डाचे सचिव नितीन उपासनी यांच्याशी संपर्क साधला. मुलाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देऊ यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. प्रणव माळीची जिद्द तसेच पालक आणि मुख्याध्यापकांची इच्छा बघून उपासनी यांनी त्याला सहकार्य करण्याचे ठरविले आणि आयसीयुमध्ये परीक्षा घेण्याची तयारी केली. मात्र, वैद्यकिय अहवाल, प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचे शिफारसपत्र मागवून घेण्यात आले. ते त्यांनी बोर्डाला आज सादर केले.
त्यानुसार आज सकाळी ओझरवरून त्या मुलाचा बारकोड असलेली उत्तर पत्रिका मागून घेण्यात आली. पंचवटीतील स्वामी नारायण शाळेतून उत्तरपत्रिका घेण्यात आली. आणि १० वाजून ५० मिनीटांनी प्रणवला देण्यात आली. एक सुपरवायझरही आयसीयुत नियुक्त करण्यात आला आणि एक वाजता त्याचा पेपर घेऊन तो नितीन उपासनी यांनी सीलबंद करून पुन्हा परीक्षा केंद्राकडे पाठवून दिला. त्यामुळे आयसीयुमध्ये असूनही त्याला परीक्षा देता आल्याचे समाधान मिळाले.