नाशिकच्या विद्यार्थ्यांनी रविवारी दिली महाराष्ट्र बंदमुळे पुढे ढकललेली टायपिंगची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 04:26 PM2018-01-07T16:26:37+5:302018-01-07T16:34:54+5:30

महाराष्ट्र बंधमुळे पुढे ढकलण्यात आलेली टायपिंग परीक्षा रविवारी (दि.7) रोजी नाशिक जिल्ह्यातील 6 केंद्रावर घेण्यात आली. कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाने बुधवारी बंद पुकारल्यामुळे टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले होते.

Nashik students on Sunday gave the examination postponed due to Maharashtra shutdown | नाशिकच्या विद्यार्थ्यांनी रविवारी दिली महाराष्ट्र बंदमुळे पुढे ढकललेली टायपिंगची परीक्षा

नाशिकच्या विद्यार्थ्यांनी रविवारी दिली महाराष्ट्र बंदमुळे पुढे ढकललेली टायपिंगची परीक्षा

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र बंदमुळे पुढे ढकलली परीक्षा रविवारी संपन्ननाशिक जिल्ह्यातील 6 केंद्रावर शांततेत परीक्षा परीक्षा सुरळीत पार पडल्याने विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास

नाशिक : भारिप बहुजन महासंघाने बुधवारी (दि.3) पुकारलेल्या महाराष्ट्र बंधमुळे पुढे ढकलण्यात आलेली टायपिंग परीक्षा रविवारी (दि.7) रोजी नाशिक जिल्ह्यातील 6 केंद्रावर घेण्यात आली. कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाने बुधवारी बंद पुकारल्यामुळे टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले होते. परंतु परीक्षा परिषदेने बुधवारी परीक्षा होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची रवीवारी परीक्षा घेऊन पुन्हा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार परीक्षेचे नियोजन पूर्ववत केले आहे. 
कोरेगाव भीमा प्रकणानंतर राज्यभरात उसळलेल्या हिंसाचारामुळे अनेक विद्यार्थ्यांना बुधवारी परीक्षा केंद्रावरून पोहोचता आले नाही. तर परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा होऊ न शकल्याने त्यांना माघारी परतावे लागले होते. या सर्व विद्यार्थ्यांची रविवारी परीक्षा पार पडल्यामुळे विद्यार्थ्यांनी सूटकेचा निश्वास टाकला आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे मंगळवारपासून (दि. 2) सुरू झालेल्या ऑनलाइन कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा तसेच सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाची एम.फार्मसी परीक्षेचा बुधवारी पेपर होता. परंतु, महाराष्ट्र बंदचे पडसाद नाशिकमध्ये तीव्रतेने उमटल्याने शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सुरक्षेचा उपाय म्हणून शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये मंगळवारपासून घेण्यात येणारी ऑनलाइन टायपिंग परीक्षाही प्रभावित झाली होती. जिल्ह्यातील 13 केंद्रांवर 1 ते 8 डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन टायपिंग परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु बुधवारी (दि. 3) या परीक्षांच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र बंदमुळे परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्याथ्र्यामध्ये निराशा पसरली. मात्र या निर्णयामुळे जे विद्यार्थी बंदमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत त्यांना दिलासा मिळाला होता. त्यांनी अखेर रविवारी टायपिंगचा पेपर दिल्याने समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Nashik students on Sunday gave the examination postponed due to Maharashtra shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.