कॉपीमुक्त अभियानात नाशिक यशस्वी
By Admin | Published: May 8, 2017 01:45 AM2017-05-08T01:45:56+5:302017-05-08T01:46:05+5:30
नाशिक : दहावी व बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत क ॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत क ॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे. गेल्या वर्षी बारावी परीक्षेत नाशिकमधून १३८ व दहावीत १९७ कॉपीची प्रकरणे समोर आली होती, तर यावर्षी बारावीत केवळ ९४ व दहावीत १०८ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. गेल्या वर्षाच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याने कॉपीमुक्त अभियान नाशिक विभागातून यशस्वी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक विभागातील ६५ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेसाठी, तर ७३,०२७ कला व वाणिज्य शाखेच्या २२,३९७ अशा एकूण एक लाख ६८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या चार जिल्ह्यांतील ९५२ महाविद्यालयांतील २१८ केंद्रांवर यावर्षी बारावीची परीक्षा दिली, तर दहावीच्या परीक्षेला विभागातील एकूण २ लाख १२ हजार ५७६ विद्यार्थी ४१७ केंद्रांच्या माध्यमातून सामोरे गेले. या परीक्षांतील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाच्या नऊ भरारी पथकांची यंदा परीक्षांवर करडी नजर होती.
यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने बारावीचे नाशिकमधून २७, जळगावला २०, धुळे ४७ व नंदुरबारमध्ये केवळ एक असे विभागातून एकूण ९४ विद्यार्थ्यांना कॉपीच्या प्रकरणात पकडले गेले, तर दहावीचे नशिकमधून २५, धुळे ३७, जळगाव ४६ व नंदुरबारमधून शून्य कॉपीची प्रकरणे आढळली. गेला वर्षाच्या तुलनेत बारावीत हा आकडा ३८, तर दहावीत ८९ ने कमी आहे. गेल्या वर्षात मार्च २०१६ च्या बारावी परीक्षेत नाशिकमधून ५३, धुळे जिल्ह्यातून २२, जळगावमधून ५१ व नंदुरबारमधून ६ असे एकूण १३८, तर दहावीच्या परीक्षेत नाशिकमधून १०९, धुळे २१, जळगाव ५३ व धुळे १४ क ॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाने कारवाई केली होती. यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले असून, कॉपीमुक्त अभिनाच्या दृष्टीने नाशिक शिक्षण मंडळाचीही यशस्वी वाटचाल असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.