येत्या १ नोव्हेंबरपासून नाशिक-सुरत विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 01:45 AM2021-10-28T01:45:47+5:302021-10-28T01:47:11+5:30
केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विमानसेवांना आता निर्बंध शिथिल झाल्याने बुस्ट मिळाले असून येत्या १ नोव्हेंबरपासून नाशिक-सुरत ही बेळगाव मागे जाणारी हॉपींग विमानसेवा सुरू होणार आहे.
नाशिक- केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विमानसेवांना आता निर्बंध शिथिल झाल्याने बुस्ट मिळाले असून येत्या १ नोव्हेंबरपासून नाशिक-सुरत ही बेळगाव मागे जाणारी हॉपींग विमानसेवा सुरू होणार आहे. स्टार एअर कंपनीची ही विमानसेवा असून ती सोमवारी आणि शुक्रवारी अशी दोनच दिवस उपलब्ध असणार आहे. अर्थात ही हॉपींग सेवा असल्याने कितपत प्रतिसाद मिळेल ते आता दिसणार आहे. केंद्र शासनाच्या उडान येाजनेमुळे नाशिकच्या विमानतळाला चांगले दिवस आले आणि गेल्या तीन वर्षांपासून देशातील विविध मेाठ्या शहरांना नाशिक जोडले गेले. मात्र कोरेानाच्या दोन लाटेंमुळे हवाईसेवा विस्कळीत झाली. कोरोनाची दुसरी लाट संपली तरी निर्बंध कायम होते ते हळूहळू शिथिल झाल्याने आता पूर्ण क्षमतेने विमानसेवा सुरू झाल्या आहेत.