नाशिक तालुका बालिका जन्मदरात अव्वल; मात्र मनपा हद्दीत पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:06 AM2020-01-05T01:06:05+5:302020-01-05T01:07:05+5:30

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बालिका जन्मदरात नाशिक तालुका अग्रस्थानी असला तरी महापालिका हद्दीत बालिकांच्या जन्मदरात मोठी तफावत दिसून येत आहे. नाशिक तालुक्यात एक हजार मुलांमागे १०३१ बालिकांचा जन्म झाला असला तरी महापालिका हद्दीत हेच प्रमाण डिसेंबरअखेर अवघे ९१८ इतकेच म्हणजेच तालुक्याच्या तुलनेत तब्बल ११३ ने कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Nashik taluka tops in childbirth; Only in the back of Municipal limits | नाशिक तालुका बालिका जन्मदरात अव्वल; मात्र मनपा हद्दीत पिछाडीवर

नाशिक तालुका बालिका जन्मदरात अव्वल; मात्र मनपा हद्दीत पिछाडीवर

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नाशकात अत्यल्प झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बालिका जन्मदरात नाशिक तालुका अग्रस्थानी असला तरी महापालिका हद्दीत बालिकांच्या जन्मदरात मोठी तफावत दिसून येत आहे. नाशिक तालुक्यात एक हजार मुलांमागे १०३१ बालिकांचा जन्म झाला असला तरी महापालिका हद्दीत हेच प्रमाण डिसेंबरअखेर अवघे ९१८ इतकेच म्हणजेच तालुक्याच्या तुलनेत तब्बल ११३ ने कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात बालिका जन्मदराचे प्रमाण अपवादात्मक एक-दोन तालुके वगळता सदैव ९५० च्या आसपास राहिले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कधीही मोठ्या प्रमाणात लिंगभेद झाल्याचे निष्पन्न झालेले नाही किंबहुना लिंगनिदान घटना उघडकीस येण्याचे प्रकारदेखील राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नाशकात अत्यल्प झाले आहे. गत आर्थिक वर्षात बालिका जन्मदरात जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये नाशिक तालुका (१०३१) अव्वल होता. तर त्यापाठोपाठ कळवण १००८ बालिका जन्मासह द्वितीयस्थानी आणि दिंडोरी आणि मालेगाव हे दोन्ही तालुके ९९२ जन्मदरासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहे.
अन्य तालुक्यांपैकी बागलाण आणि देवळा वगळता अन्य तालुकेदेखील ९५० पेक्षा अधिक बालिका जन्मदर असलेले आहेत. केवळ देवळा ९२७ आणि बागलाण ९१९ असा जन्मदर आहे. मात्र, नाशिक महापालिका हद्दीत हा जन्मदर बागलाणपेक्षाही एका संख्येने कमी असा ९१८ पर्यंत घसरलेला आहे. त्यामुळे नाशिक महापालिका हद्दीत हा बालिकांचा जन्मदर घसरण्याच्या कारणांचा छडा लावण्याच्या उद्देशाने यंत्रणेला कार्यप्रवण करण्याची गरज निर्माण झाली आहे.डॉक्टरांसह सामान्य नागरिकांमध्येदेखील लिंगभेदाबाबत खूप चांगली जागृती झालेली आहे. त्यात लिंगनिदानसारख्या कायद्यांबाबत शासनाकडून कायदे अत्यंत कठोर करण्यात आले असून, ते तितक्याच कठोरपणे राबवले जात आहेत. त्याशिवाय नाशिक महापालिका हद्दीमध्ये महापालिकेची यंत्रणादेखील जागरूकतेने आणि प्रभावीपणे कार्यरत आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत बालिका जन्मदराचे प्रमाण हे फार कमी नसायला हवे. मात्र काही अपवादात्मक घटना घडत असल्यास माहिती नाही. पण हा योगायोगदेखील असू शकेल, असे वाटते. - डॉ. निवेदिता पवार, स्रीरोगतज्ज्ञ

Web Title: Nashik taluka tops in childbirth; Only in the back of Municipal limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.