२०-२० क्रि केट स्पर्धेत नाशिक संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 07:13 PM2019-02-18T19:13:26+5:302019-02-18T19:14:31+5:30
इगतपुरी : नाशिक जिल्हा क्रि केट असोशिएन व इगतपुरी तालुका क्र ीडा महोत्सव यांच्या वतीने भव्य लेदर (सिजन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धात अंतिम सामना नाशिक क्रि केट अकॅडमी विरु द्ध इगतपुरी जिमखाना यांच्यात होवून नाशिक क्रि केट अकॅडमी संघ हा विजयी ठरला. इगतपुरी तालुक्यात गेल्या ३५ वर्षानंतर प्रथमच रेल्वे ग्राऊंड येथे ही सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
इगतपुरी : नाशिक जिल्हा क्रि केट असोशिएन व इगतपुरी तालुका क्र ीडा महोत्सव यांच्या वतीने भव्य लेदर (सिजन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धात अंतिम सामना नाशिक क्रि केट अकॅडमी विरु द्ध इगतपुरी जिमखाना यांच्यात होवून नाशिक क्रि केट अकॅडमी संघ हा विजयी ठरला.
इगतपुरी तालुक्यात गेल्या ३५ वर्षानंतर प्रथमच रेल्वे ग्राऊंड येथे ही सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेनंतर बक्षीस वितरण कार्यक्र म प्रसंगी प्रमुख पाहुण ेम्हणून नाशिक जिल्हा क्रि केट असोशिएनचे सेक्रेटरी समीर रकटे, नाशिक जिल्हा निवड समितीचे राजु आहेर, सतीश गायकवाड, इगतपुरीचे उपनगराध्यक्ष नईम खान, नगरसेवक सुनील रोकडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदलाल भागडे, सतिश यादव, शरीरसौष्ठपटु योगेश निकम, नारायण निकम आदी उपस्थित होते.
या वेळी अंतिम सामन्यात नाशिकच्या संघाने १९५ धावा केल्या यात अभिजित पवार याने ५३ धावा केल्या व प्रथमेश शिंदे यांनी ५० धाव केल्या. इगतपुरी संघाचे राहुल भागडे याने दोन गडी बाद केले. मात्र इगतपुरी फलंदाजी मध्ये रोहित भट याने ४४ धाव रमेश उबाळे याने २८ धाव केल्या एकूण १३५ धावांची मजल गाठली.
या वेळी प्रथम विजयी नाशिक क्रि केट अकॅडमी संघाला एकवीस हजार रुपये, ट्रॉफी. उपविजेत्या इगतपुरी क्रि केट जिमखाना संघाला अकरा हजार रुपये ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. ‘म्यान आॅफ द मॅच’ अभिजित पवार, ‘मॅन आॅफ द सिरीज’ राहुल भागड, यांना देण्यात आली. या वेळी इगतपुरी तालुक्यातील प्रथमच आदिवासी भागातील खेळाडूंना जिह्यातील नामवंत खेळाडूंबरोबर खेळून अंतिम सामान्य पर्यंत मजल गाठता आली हे विशेष होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी विजय सोनवणे, अण्णा पार्टे, रमेश उबाळे, रवींद्र डावखर, योगेश आडोळे, अनिल वाकचौरे, डी. बी. सोनवणे, सुनील आहेर, संजय बोराडे, अभिषेक देहाडे, नितीन चौधरी, हरीश भागडे, आविष्कार देहाडे आदींनी परिश्रम घेतले.