नाशिककरांनी फेकला दहा हजार टन कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:54 AM2017-10-19T00:54:36+5:302017-10-19T00:56:53+5:30
सतरा दिवसांची आकडेवारी : दिवाळीच्या साफसफाईतून कंत्राटदारांची कमाई नाशिक : दिवाळी आली की घरोघरी साफसफाईला सुरुवात केली जाते. छताला लागलेली जाळे-जळमटी काढण्यापासून ते भंगार साहित्य फेकून देण्याची लगबग पहायला मिळते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १७ दिवसांत घरोघरी झालेल्या साफसफाईच्या माध्यमातून नाशिककरांनी तब्बल दहा हजार टन कचरा घराबाहेर फेकला आहे. या साफसफाईमुळे भंगार व्यावसायिकांचे चांगभलं तर झालेच शिवाय, घंटागाडी ठेकेदारांसह खतप्रकल्पचालकाचीही कमाई झाली आहे.
सतरा दिवसांची आकडेवारी : दिवाळीच्या साफसफाईतून कंत्राटदारांची कमाईनाशिककरांनी फेकला दहा हजार टन कचरा
नाशिक : दिवाळी आली की घरोघरी साफसफाईला सुरुवात केली जाते. छताला लागलेली जाळे-जळमटी काढण्यापासून ते भंगार साहित्य फेकून देण्याची लगबग पहायला मिळते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १७ दिवसांत घरोघरी झालेल्या साफसफाईच्या माध्यमातून नाशिककरांनी तब्बल दहा हजार टन कचरा घराबाहेर फेकला आहे. या साफसफाईमुळे भंगार व्यावसायिकांचे चांगभलं तर झालेच शिवाय, घंटागाडी ठेकेदारांसह खतप्रकल्पचालकाचीही कमाई झाली आहे.
दीपोत्सवात घरोघरी लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी घरातील कोपरा न कोपरा स्वच्छ केला जातो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिना-पंधरा दिवस अगोदर घरोघरी साफसफाई मोहिमेला वेग येतो. शहरात महापालिकेमार्फत कचरा उचलण्यासाठी २०६ घंटागाड्यांची व्यवस्था कार्यरत आहे. या घंटागाड्यांमार्फत प्रतिदिन सरासरी सुमारे ४५० टन कचरा खतप्रकल्पावर वाहून नेला जातो. महापालिकेने जानेवारी २०१७ पासून खतप्रकल्पही खासगी कंपनीला चालवायला दिलेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या साफसफाईतून घराबाहेर काढण्यात आलेल्या कचºयाची आकडेवारी पाहिल्यास दि. १ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत तब्बल साडेदहा हजार टन कचरा खतप्रकल्पावर वाहून नेण्यात आला आहे. या कालावधीत सरासरी प्रतिदिन ६५० टन कचरा निघाला आहे. प्रतिदिन सुमारे २०० टन कचरा अधिक निघाला आहे. आकडेवारीनुसार, दैनंदिन कचºयाव्यतिरिक्त १७ दिवसांत सुमारे ४ हजार टन जादा कचरा नाशिककरांनी घराबाहेर काढला आहे. १ ते १५ आॅक्टोबर
या कालावधीत खतप्रकल्पावर घंटागाड्यांच्या ३४३८ फेºया झालेल्या आहेत. महापालिकेकडून घंटागाड्यांना टनानुसार कचºयाचा मोबदला दिला जातो. दिवाळीत जादा कचºयाची वाहतूक झाल्याने ठेकेदारांना जादा कमाई झाली असून, खतप्रकल्प चालविणाºया कंपनीचीही ‘दिवाळी’ साजरी झाली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, दि. १ आॅक्टोबरला ६४१ टन, दि. २- ६०२ टन, दि. ३-६१० टन, दि. ४- ५६७ टन, दि. ५ -५५८ टन, दि. ६- ५५२ टन, दि. ७- ५८१ टन, दि. ८-६५० टन, दि. ९-६४४ टन, दि. १०- ६३७ टन, दि. ११- ६२७ टन, दि. १२- ६१७ टन, दि. १३- ५९४, दि. १४- ६१८ टन आणि दि. १५-६६६ टन कचरा खतप्रकल्पावर वाहून नेण्यात आला आहे.भंगार बाजारातील कचराही खतप्रकल्पावर महापालिकेच्या वतीने दि. १२ आॅक्टोबरपासून सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची मोहीम सुरू आहे. पहिले तीन दिवस अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. रोज सुमारे १०० गाड्या कचरा खतप्रकल्पावर वाहून नेला जात आहे. त्यामुळे खतप्रकल्पावर कचºयाचे ढिगारे पहायला मिळत आहेत.