नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून प्रियकराने तिघांना पेटविले : नऊ महिन्यांच्या चिमूरडीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 11:29 AM2018-08-06T11:29:34+5:302018-08-06T13:08:17+5:30

नाशिक : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़६) पहाटेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील मायको दवाखाना पाठीमागे असलेल्या कालिकानगर येथे घडली. यामध्ये नऊ महिन्यांच्या नातीचा मृत्यू झाला असून प्रेयसी व तिची मुलगी सुमारे ७० टक्के भाजल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान या घटनेनंतर प्रियकर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ 

In Nashik, three people got immoral from adultery | नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून प्रियकराने तिघांना पेटविले : नऊ महिन्यांच्या चिमूरडीचा मृत्यू

नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून प्रियकराने तिघांना पेटविले : नऊ महिन्यांच्या चिमूरडीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देपंचवटी परिसरातील मायको दवाखान्याजवळ घटना फरार प्रियकराचा शोध

नाशिक : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़६) पहाटेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील मायको दवाखाना पाठीमागे असलेल्या कालिकानगर येथे घडली. यामध्ये नऊ महिन्यांच्या चिमूरडीचा मृत्यू झाला असून प्रेयसी व तिची मुलगी सुमारे ७० टक्के भाजल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान या घटनेनंतर प्रियकर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील मायको दवाखान्याजवळ राहणा-या संगीता सुरेश देवरे (वय ३८) या महिलेचे  उत्तर प्रदेशातील मथुरा येथील संशयित आरोपी जलालुद्दीन खान (50)  नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. रविवारी मध्यरात्री त्यांचे वाद झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास प्रियकर खान याने प्रेयसी संगीता देवरे,  संगीताची मुलगी प्रीती रामेश्वर शेंडगे व प्रितीची नऊ महिन्यांची मुलगी सिद्धी रामेश्वर शेंडगे या तिघींच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले़ यामध्ये नऊ महिन्यांची चिमूरडी सिद्धीचा मृत्यू झाला़ विशेष म्हणजे प्रीती आणि सिद्धी या दोन दिवसांपुर्वीच आईला भेटण्यासाठी आलेल्या होत्या़ 

दरम्यान, या घटनेतील तिन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता चिमूरड्या सिद्धीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी घोषीत केले़ तर, संगीता व प्रिती या दोघींवर जळीत कक्षामध्ये उपचार सुरू आहेत़ प्रियकर खान हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

Web Title: In Nashik, three people got immoral from adultery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.