लसीकरणाच्या महिनापूर्तीस उत्तर महाराष्ट्रात नाशिक अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 08:52 PM2021-02-17T20:52:37+5:302021-02-18T00:18:05+5:30

नाशिक : नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात लसीकरणाला वेग देण्यात आला असला तरी अद्यापही निर्धारित लक्ष्य गाठण्यातदेखील कोणत्याच जिल्ह्याला यश मिळालेले नाही. त्यातही लसीकरणाच्या महिनापूर्तीस आतापर्यंत लस घेतलेल्यांच्या २६,५७२ संख्येसह नाशिक जिल्हा विभागात अव्वल आहे. मात्र, टक्केवारीत नाशिक ५७.२९ टक्क्यांसह तृतीय स्थानी आहे.

Nashik tops in North Maharashtra | लसीकरणाच्या महिनापूर्तीस उत्तर महाराष्ट्रात नाशिक अव्वल

लसीकरणाच्या महिनापूर्तीस उत्तर महाराष्ट्रात नाशिक अव्वल

Next
ठळक मुद्दे आगेकूच : लसीकरण केलेल्यांच्या संख्येत प्रथम; टक्केवारीत तृतीय स्थानी

नाशिक : नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात लसीकरणाला वेग देण्यात आला असला तरी अद्यापही निर्धारित लक्ष्य गाठण्यातदेखील कोणत्याच जिल्ह्याला यश मिळालेले नाही. त्यातही लसीकरणाच्या महिनापूर्तीस आतापर्यंत लस घेतलेल्यांच्या २६,५७२ संख्येसह नाशिक जिल्हा विभागात अव्वल आहे. मात्र, टक्केवारीत नाशिक ५७.२९ टक्क्यांसह तृतीय स्थानी आहे.
लसीकरणामध्ये प्रारंभापासूनच नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्रात काहीसा आघाडीवर होता. नाशिकमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिल्या दिवशी दिलेला प्रतिसाद लक्ष्यांकाच्या ५७ टक्केच होता. साधारण तेच प्रमाण जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कायम राखले. पुढील टप्प्यात या आकडेवारीत काहीशी वाढदेखील झाली. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतील लसीकरणापेक्षा नाशिकने आघाडी मिळविली आहे. १६ जानेवारीला झालेल्या लसीकरणाच्या प्रारंभापासून १६ फेब्रुवारीच्या लसीकरणाच्या महिनापूर्ततेपर्यंत २६,५७२ जणांनी लसीकरण करून घेतले आहे. त्यापाठोपाठ २३,१६९ लसीकरण नगर जिल्ह्याचे, तर जळगाव जिल्ह्यात १२५१५, धुळे जिल्ह्यात ७,८०८, तर नंदुरबार जिल्ह्यात ७५७३ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात एकूण लक्ष्यांकाच्या तुलनेत धुळे जिल्हा ६८.१७ टक्क्यांसह प्रथम, नंदुरबार ६१.७० टक्क्यांसह द्वितीय, नाशिक जिल्हा ५७.२९ टक्क्यांसह तृतीय, जळगाव जिल्हा ५५.८० टक्क्यांसह चौथ्या स्थानी, तर ५५.४८ टक्क्यांसह नगर जिल्हा पाचव्या स्थानावर आहे.

विभागाची सरासरी ५७.८१
नाशिक विभागास या महिनाभरात एकूण १ लाख ३४ हजार २९५ लसींचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. निर्धारित झालेल्या लक्ष्याच्या तुलनेत विभागात ७७ हजार ६३७ जणांचे लसीकरण करण्यात आले. या संमिश्र प्रतिसादामुळे विभागातील लसीकरणाच्या टक्केवारीचे प्रमाण ५७.८१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

Web Title: Nashik tops in North Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.