अपसंपदा गुन्ह्यात नाशिक अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 01:29 AM2018-10-30T01:29:49+5:302018-10-30T01:30:55+5:30

बेकायदेशीर मार्गाने पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाने अपसंपदा कमविणाऱ्या शासकीय नोकरदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात १ जानेवारी ते २४ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १९ गुन्हे दाखल केले आहेत़ यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक अशा सात प्रकरणांची चौकशी सूर आहे़, तर नाशिक खालोखाल मुंबई परिक्षेत्राचा समावेश आहे़

 Nashik tops upstairs crime | अपसंपदा गुन्ह्यात नाशिक अव्वल

अपसंपदा गुन्ह्यात नाशिक अव्वल

googlenewsNext

नाशिक : बेकायदेशीर मार्गाने पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाने अपसंपदा कमविणाऱ्या शासकीय नोकरदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात १ जानेवारी ते २४ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १९ गुन्हे दाखल केले आहेत़ यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक अशा सात प्रकरणांची चौकशी सूर आहे़, तर नाशिक खालोखाल मुंबई परिक्षेत्राचा समावेश आहे़  शासकीय नोकराने भ्रष्टाचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वत:च्या नावे किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडे, पदधारण करण्याच्या कालावधीत कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देऊ शकणार नाही अशा आर्थिक साधन संपत्तीचा किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमविणाºयांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल केला जातो़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठही परिक्षेत्रात या वर्षातील २४ आॅक्टोबरपर्यंत अपसंपदेचे १९ गुन्हे दाखल  करण्यात आले आहेत़ यामध्ये नाशिकमध्ये सात गुन्ह्णांची चौकशी असून, राज्यात नाशिक परिक्षेत्र प्रथम क्रमांकावर आहे.या खालोखाल मुंबई (४), औरंगाबाद (३), नागपूर (२), ठाणे, पुणे, नांदेड परिक्षेत्रामध्ये एका प्रकरणाची चौकशी सुरू  आहे़
गत नऊ वर्षांत अपसंपदेचे २१० गुन्हे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१० ते २४ आॅक्टोबर २०१८ या ८ वर्ष १० महिन्यांच्या कालावधीत राज्यातील २१० अपसंपदेच्या प्रकरणांचा तपास केला आहे़ एसीबीच्या आकडेवारीनुसार २०१४ मध्ये सर्वाधिक अर्थात ४९ प्रकरणांची, तर २०१५ मध्ये ३५ प्रकरणांची चौकशी करण्यात आली होती़ अपसंपदेची २०१० मध्ये १८, २०११ मध्ये १५, २०१२ मध्ये २२, २०१३ मध्ये १६, २०१६ मध्ये १७, २०१७ मध्ये २२ तर २०१८ मध्ये १९ प्रकरणांची चौकशी सुरू आहे़

Web Title:  Nashik tops upstairs crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.