Nashik: नाशिक महपालिकेत रिमोट कन्ट्रोल रोबोटची चाचणी
By Suyog.joshi | Published: October 27, 2023 08:27 PM2023-10-27T20:27:40+5:302023-10-27T20:28:03+5:30
Nashik News: नाशिक शहरातील व औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या वाढत्या धोक्यांचे प्रमाण लक्षात घेता मनपा अग्निशमन विभागाकडुन राजीवगांधी भवन येथील प्रशासकीय इमारतीमध्ये फ्रांन्स कंपनीने तयार केलेला रिमोट कन्ट्रोल रोबोटची प्रत्यक्ष पाहणी केली व त्याची चाचणी घेतली आहे.
- सुयोग जोशी
नाशिक -शहरातील व औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या वाढत्या धोक्यांचे प्रमाण लक्षात घेता मनपा अग्निशमन विभागाकडुन राजीवगांधी भवन येथील प्रशासकीय इमारतीमध्ये फ्रांन्स कंपनीने तयार केलेला रिमोट कन्ट्रोल रोबोटची प्रत्यक्ष पाहणी केली व त्याची चाचणी घेतली आहे. भविष्यात धोकेदायक ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान - अधिकारी यांना काम करणे शक्य होणार नाही, उदा. तळाघरामध्ये, धुरामध्ये, त्याचप्रमाणे केमिकल टँक असतील किंवा एलपीजी टँक ,बुलेट, इलेक्ट्रीक वाहने,एलपीजी ,सीएनजी या वाहनांची आग विझविण्यासाठी सदर रोबोटचा वापर करता येईल.
जेणेकरून अग्निशमन जवानांना कुठलाही धोका उद्भवणार नाही. हा रोबोट हा बॅटरीवर चालणारा आहे. बॅटरी कंपेसिटी एका वेळेस १२ तास काम करु शकता व एक बॅटरी स्टॅण्डवाय राहील. त्यामुळे २४ तास फायर फायटींगचे काम चालू राहिल. बॅटरी चार्जिंग करण्यासाठी ४ ते ५ तासाचा कालावधी आहे. या रोबोटची चेसिज हि उच्च प्रतिच्या धातुची आहे. तो ८०० डि.सेंटीग्रेट तापमान सहन करु शकते. रोबोटवरती असणार वॉटर मॉनिटर जवळपास ६० मिटरचा थ्री देणारा आहे. त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली आहे.
रोबोटचे जिना चढणे तसेच उतरण्याचा स्लोप ४० डिग्री आहे. साईड स्लोप ३५ डिग्री इतका आहे. त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली आहे. रोबोटचे ब्रेक हे इलेक्ट्रोमॅग्नेटीक आहे. रोबोटच्या समोरील भागास एलइडी लाईट आहे व धर्मल इमेज कॅमेरा आहे. अशा प्रकारे नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवलेला रोबोट आहे. मोठ्या आगीच्या घटनेच्या ठिकाणी तसेच धोकेदायक क्षेत्रामध्ये जिवीत व मालमत्तेचे रक्षण करण्या खुप मोठया प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. प्रत्यक्ष चाचणीसाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मुख्य अग्नीशमन अधिकारी संजय बैरागी उपस्थित होते.