नाशिकमध्ये दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू; दोन तरुण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 12:26 AM2019-04-27T00:26:58+5:302019-04-27T00:28:40+5:30
दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
नाशिक : नाशिकमध्ये वाडीवऱ्हे, पंचवटी शिवारात झालेल्या दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरटीओ कार्यालयाकडून फुलेनगर कडे जात असताना ऍक्टिवा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने पेठफाटा येथे भरधाव दुचाकी शुक्रवारी (दि.26) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीवरील तीन तरुण गंभीर जखमी झाले असून जखमींपैकी अरुण यशवंत शार्दुल (२० रा. फुलेनगर) याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्याचे दोघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून प्रथम उपचार करून तत्काळ रात्री खासगी रुग्णालयात खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. जखमींमध्ये सुरज अंतोष जाधव (१८रा. फुलेनगर) याच्यासह त्याच्या एका मित्राचा समावेश आहे.
दुसऱ्या घटनेत पाथर्डी फाटा ज्ञानेश्वर नगर येथील शिक्षक शरद काशिनाथ पागेरे (४०) हे वाडीवऱ्हे येथुन पुतणीचा विवाह आटोपून आपल्या पत्नी व लहान मुलासमवेत घरी परतत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला महामार्गावर पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत ते व पत्नी, मुलगा रस्त्यावर कोसळले, सुदैवाने पत्नी व मुलाला किरकोळ मार लागला. मात्र पागेरे यांना जबर मार लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता पागेरे यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. ते अभिनव बाळ विकास मंदिर, सिडको येथील संगीत शिक्षक होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे. पत्नी व दीड वर्षांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.