महिन्याभरापूर्वी एक मुलगी आजारानं गेली, आता दोन मुलींचा बुडून मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 11:24 AM2021-02-14T11:24:58+5:302021-02-14T11:27:25+5:30

पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन बहिणी परतल्याच नाहीत; दोन मुलींच्या मृत्यूनं कुटुंबाला जबर धक्का; संपूर्ण गावावर शोककळा

in nashik two sisters drowned while pouring water from well | महिन्याभरापूर्वी एक मुलगी आजारानं गेली, आता दोन मुलींचा बुडून मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

महिन्याभरापूर्वी एक मुलगी आजारानं गेली, आता दोन मुलींचा बुडून मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Next

दिंडोरी (नाशिक)- तालुक्यातील विळवंडी येथे पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पाय घसरून बुडून मृत्यू झाला. पद्मा पारधी (११ वर्षे) आणि फशा पारधी (९ वर्षे) अशी मृत मुलींची नावे आहेत. त्या पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. मात्र पाय घसरून विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

पद्मा उत्तम पारधी व तिची लहान बहीण फशा उत्तम पारधी या विळवंडी शिवारातील राजेंद्र पोपट पारधी यांच्या विहिरीवर हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी गेले असता, पाणी काढताना पाय घसरून पडल्याने दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. 

घटनेचा अधिक तपास दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण, धनंजय शिलावटे करत आहेत. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली  आहे. उत्तम विठ्ठल पारधी  यांना चार मुली व एक मुलगा असून एक महिन्यापूर्वीच एका मुलीचे गंभीर आजाराने निधन झाले. दोन मुलींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने पारधी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 

Web Title: in nashik two sisters drowned while pouring water from well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.