खून सत्राने हादरले नाशिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 01:41 AM2022-05-21T01:41:48+5:302022-05-21T01:43:20+5:30

शहरात खूनसत्र सुरूच असून दोन दिवसांत तब्बल चार खून पडले आहेत. गुरुवारी (दि. १९) झालेल्या दोन घटनांच्या तपासाला गती मिळत नाही तोच आनंदवली शिवारात प्रथमेश रतन खैर (२३, रा. साईप्रीत रो-हाऊस, कामठवाडे) या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला; तर शुक्रवारी (दि. २०) पहाटे साडेचारच्या सुमारास हरीश भास्कर पाटील (४९, रा. वारजे जकात नाका, पुणे) या प्रवाशाचा खून झाला.

Nashik was shaken by the murder session | खून सत्राने हादरले नाशिक

खून सत्राने हादरले नाशिक

googlenewsNext
ठळक मुद्देदोन दिवसांत चार खून द्वारका परिसरात प्रवाशाला भोसकले आनंदवली परिसरात मित्रांनीच घेतला जीव

नाशिक : शहरात खूनसत्र सुरूच असून दोन दिवसांत तब्बल चार खून पडले आहेत. गुरुवारी (दि. १९) झालेल्या दोन घटनांच्या तपासाला गती मिळत नाही तोच आनंदवली शिवारात प्रथमेश रतन खैर (२३, रा. साईप्रीत रो-हाऊस, कामठवाडे) या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला; तर शुक्रवारी (दि. २०) पहाटे साडेचारच्या सुमारास हरीश भास्कर पाटील (४९, रा. वारजे जकात नाका, पुणे) या प्रवाशाचा खून झाला.

शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता हरीश पाटील पुण्यावरून आलेल्या बसमधून उतरून पायी जात होते. द्वारका परिसरातील पौर्णिमा बसस्टॉपजवळ पाटील यांना एका दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे दुचाकीस्वार आणि पाटील यांच्यात वादविवाद झाला. या वेळी टोळक्यातील एकाने पाटील यांच्यावर चाकूने वार केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित अशोक दत्ता हिंगे, नदीम सलीम बेग (२३), रोहित अशोक पताड (१९), शुभम दिलीप घोटेकर (२०, सर्व रा. विहितगाव) यांना ताब्यात घेतले; तर त्यांचा अन्य एक सहकारी फरार आहे.

आनंदवल्ली शिवारातील घटनेत तीन मित्रांनी एका मित्रास जीव जाईपर्यंत मारहाण केली. यात प्रथमेश खैर या तरुणाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी सागर चित्तलकर या संशयितास ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी संशयित सागर चित्तलकर, शुभम उगलमुगले, शंतनू देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आनंदवली शिवारातील बेंडकुळेनगरमध्ये गुरुवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास काही नागरिकांना बेवारस दुचाकी व एक बॅग पडलेली दिसली. जवळच मृतदेह पडलेला होता. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी मृतदेहावर मारहाण केल्याच्या खुणा आढळून आल्याने खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

--------

घटनांचा पोलीस प्रशासन तपास करीत आहे. यातील काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील म्हसरूळ आणि भद्रकालीतील घटना तत्कालीन कारणांतून घडल्याचे दिसून येत आहे. आनंदवली शिवारातील घटनेचा तपास सुरू आहे. पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतील.

- जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त

------------

बुधवार आणि गुरुवारच्या घटना

दरम्यान, मुलाच्या हट्टीपणाला कंटाळून बापाने मुलाचा खून करीत स्वत: गळफास घेतल्याची घटना पंचवटीतील शिवाजी चौक परिसरात गुरुवारी (दि. १९) उघडकीस आली. या प्रकरणी गळफास घेणाऱ्या जगदीश पुंडलिक जाधव (४८) यांच्यावर मुलगा प्रणव जाधव (१७) याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आकाश पेट्रोल पंपाजवळ बुधवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास २४ वर्षीय यश रामचंद्र गांगुर्डे याचा मित्रांनी चॉपरने वार करून यशचा खून केला.

Web Title: Nashik was shaken by the murder session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.