Nashik: नाशिकच्या पांजरापोळची वनराई उद्योगांसाठी देण्यास जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचा विरोध
By संजय पाठक | Published: May 1, 2023 03:10 PM2023-05-01T15:10:38+5:302023-05-01T15:11:23+5:30
Nashik: नाशिक शहरालगत चुंचाळे शिवारात असलेल्या सुमारे सव्वा आठशे हेक्टर क्षेत्रातील पंजारापोळ संस्थेला दिलेली आणि वनराईने नटलेली जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यास प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध केला आहे
- संजय पाठक
नाशिक- शहरालगत चुंचाळे शिवारात असलेल्या सुमारे सव्वा आठशे हेक्टर क्षेत्रातील पंजारापोळ संस्थेला दिलेली आणि वनराईने नटलेली जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यास प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध केला आहे.
सध्या नाशिक मधील पंजारापोळ येथील जागा उद्योगांसाठी घेण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहेत त्यावरुन पर्यावरण प्रेमी आणि उद्योग समर्थक असा वाद सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजेंद्र सिंह यांनी आज सकाळी या क्षेत्राची पाहणी केली आणि त्यानंतर घेतलेला पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली पंजारापोळ येथील वनराई म्हणजे नाशिक शहराची फुफ्फुस असून त्यामुळेच पर्यावरणाचे रक्षण होत आहे ही जागा उद्योगांसाठी घेऊ नका असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. ज्या मंत्री आमदारांचा ही जागा घेण्यासंदर्भातील प्रस्ताव आहे त्यांनी आपल्या भावी पिढीला काय उत्तर द्यावे लागतील याचाही विचार करावा असेही राजेंद्रसिंह म्हणाले.
दरम्यान, कोकणातील बारसू येथील रिफायनरीवरून राजकीय रण माजले असताना राजेंद्रसिंह यांनी विकासासाठी निसर्गाचा नाश करू नका असे आवाहन केले रिफायनरी सारख्या उद्योगातुन लालची विकास होत आहे, मात्र शाश्वत विकास झाला पाहिजे, असेही राजेंद्रसिंह म्हणाले.
नाशिक शहरात रामकुंड परिसरात गोदावरी नदी पात्रात असेलेले काँक्रीटीकरण काढावे असेही राजेंद्रसिंह यांनी सांगितले.